ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक महासंघाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी फिरोज खान पठाण यांची निवड

On: January 25, 2026 3:40 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा | अशफाक खान

महाराष्ट्र राज्य प्रवीण प्रशिक्षक महासंघाच्या राज्यस्तरीय कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण सभा परिजात नगर नाशिक येथे दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत महासंघाचे अध्यक्ष श्री. कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांसाठी जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली.

या निर्णयानुसार, यवतमाळ जिल्ह्यासाठी पांढरकवडा येथील श्री. फिरोज खान इसहाक खान पठाण यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकुशलतेवर व संघटनात्मक क्षमतेवर विश्वास दाखवत, राज्यस्तरीय कोअर कमिटीने त्यांच्यावर यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

निवडीनंतर बोलताना श्री. फिरोज खान पठाण यांनी म्हटले की,
“राज्यस्तरीय कोअर कमिटीने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी निश्चितच सोनं करून दाखवीन. महासंघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रशिक्षकांच्या समस्या, हक्क व विकासासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करीन.”
यावेळी त्यांनी राज्यस्तरीय कोअर कमिटीचे सरचिटणीस श्री. मनोहर सरोदे, प्रसिद्धी प्रमुख श्री. अजय सोरदे तसेच सर्व कोअर कमिटी सदस्यांचे आभार व्यक्त केले.

त्यांच्या निवडीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रात त्यांचा असलेला अनुभव लक्षात घेता, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील महासंघ अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment