ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

बोटोणीमध्ये ‘मनसे’चा झंझावात; राजू उंबरकरांच्या उपस्थितीत शेकडो युवक-ज्येष्ठांचा जाहीर पक्षप्रवेश

On: January 29, 2026 1:20 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी / प्रतिनिधी :

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, मारेगाव तालुक्यातील बोटोणी व बोटोणी पोळ परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मोठे शक्तिप्रदर्शन केले आहे. या भागातील शेकडो युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

वणी येथील ‘शिवमुद्रा’ जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात मनसेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक पक्षप्रवेश झाला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे आणि रवी आगासकांडे यांच्या नेतृत्वाखाली बोटोणी परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा खांद्यावर घेत पक्षाशी निष्ठा जाहीर केली.

🎯 निवडणुकांच्या तोंडावर ‘इनकमिंग’ जोरात
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात मनसेकडे मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. बोटोणी व बोटोणी पोळ येथील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे विशेषतः ग्रामीण भागात मनसेचे पारडे जड होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

🎯 मनसे हाच स्थानिक प्रश्नांचा खरा पर्याय – प्रवेशकर्त्यांची भावना
या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी बोलताना नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवक व ज्येष्ठ नागरिकांनी, “राज्यातील सद्यस्थितीतील राजकारण आणि स्थानिक पातळीवरील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव सक्षम आणि प्रामाणिक पर्याय आहे,” अशी ठाम भावना व्यक्त केली. विकास, रोजगार, पाणी, रस्ते, शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांसाठी मनसेचे धोरण स्पष्ट व आक्रमक असल्यामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

🎯 प्रमुख प्रवेशकर्त्यांची नावे

बोटोणी येथून हर्ष मनोर घुमे, अनिकेत रुपेश आगासकांडे, अंकित सुभाष पायलवार, रोहित सुरेश शेंद्रे, विजय हुसेन कोहळे, मनीष रवींद्र आगासकांडे, पंकज चंद्रभान शेंद्रे, जय देवीदास जतकर, मंगेश नामदेव वाघाडे, रितेश शंकर राऊत, वैभव छत्रपती वाघाडे, संकेत रुपेश आगासकांडे, कृष्णा सतीश मते, साजन मेश्राम यांचा समावेश आहे.
तर बोटोणी पोळ येथून भीमा मोरे, नामदेव आत्राम, गोविंद टेकाम, वसंता टेकाम, अजाब आत्राम, अविनाश जुनगरी, रमेश आत्राम, निकेश आत्राम, अजाब रामकुरे, सचिन आत्राम यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला.

🎯 मनसे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या सोहळ्याप्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, तालुका सचिव विनोद कुचणकार यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत, आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

🎯 राजकीय गणिते बदलण्याची शक्यता
या भव्य पक्षप्रवेशामुळे मारेगाव तालुक्यातील आणि विशेषतः वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण भागात मनसेला मिळत असलेला वाढता प्रतिसाद आगामी निवडणुकांत निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment