ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; नांदेपेरा बायपासवर बेकायदेशीर जड वाहतूक सुरूच प्रशासकीय दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात;

On: January 30, 2026 3:08 PM
Follow Us:
---Advertisement---

८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा ‘रस्ता रोको’चा इशारा


✍️वणी (प्रतिनिधी):

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे प्रतिबंधित केलेल्या नांदेपेरा बायपास ते खैरी वडकी या मार्गावरून आजही सर्रासपणे जड वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशांचे उघड उल्लंघन होत असतानाही संबंधित यंत्रणा बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ८ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन आणि ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा मनसे नेते फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे.

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाने १० ऑक्टोबर २०२२ रोजी आदेश क्रमांक १४९८/२०२२ नुसार नांदेपेरा बायपास ते खैरी वडकी हा मार्ग १० टनांपेक्षा अधिक वजनाच्या वाहनांसाठी पूर्णतः प्रतिबंधित केला होता. हा रस्ता तांत्रिकदृष्ट्या अवजड वाहनांसाठी सक्षम नसल्याने, सर्व जड वाहतूक खैरी–वडकी–करंजी–मारेगाव या पर्यायी मार्गे वळवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात या आदेशाची अक्षरशः पायमल्ली होत असून दिवसरात्र या मार्गावरून अवजड ट्रक, डंपर आणि कंटेनरची बिनधास्त वाहतूक सुरू आहे.

🎯 रस्त्याची चाळण, धुळीचे साम्राज्य आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न

बेकायदेशीर जड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार, दमा, खोकला, डोळ्यांची जळजळ अशा गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल असल्याने शाळकरी मुले, पालक, शिक्षक यांचे रोजचे ये-जा करताना मोठ्या धोक्यात पडत आहेत.

🎯 अपघातांत वाढ; नागरिकांच्या जीवाशी खेळ

अतिवेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे दुचाकीस्वार, पादचारी आणि हलक्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून, कोणत्याही मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या ढिसाळ व निष्काळजी भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

🎯 मनसेचे निवेदन; प्रशासनाला थेट इशारा

या संपूर्ण प्रकरणी मनसे नेते फाल्गुन गोहोकार यांनी वाहतूक नियंत्रक शाखा, वणी यांना निवेदन देत तातडीने जड वाहतूक बंद करण्याची ठाम मागणी केली आहे.
“जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या वाहनधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे. जर येत्या ८ दिवसांत ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर मनसे व ग्रामस्थांच्या वतीने ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील,” असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

🎯 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

🎯 निवेदन देताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित

निवेदन सादर करताना आकाश काकडे, लकी सोमकुवर, योगेंद्र तूरणकर, प्रवीण कळसकर, धीरज पेचे, रणजीत बोंडे, धीरज बगवा, कैलास काकडे, वैभव पुराणकर, सौरव राजूरकर, अंकित काकडे, रुपेश जोगी, कवडू काकडे, चेतन सुर, सुरज काकडे, दिनेश झीले, अतुल तेलतुंबडे यांच्यासह असंख्य मनसे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🎯 प्रश्न कायम – प्रशासन कधी जागे होणार?

जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी न होणे, हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळ थांबवण्यासाठी प्रशासन तातडीने कारवाई करणार का, की एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच हालचाल होणार, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

वणीत तिथीनुसार शिवजयंतीचा ऐतिहासिक जल्लोष; मनसेकडून भव्य तयारी, गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींसह लेझर शोने रंगणार शिवकाल

वणीत ‘अपर जिल्हाधिकारी’ तर शिरपूरला ‘अपर तहसील’ कार्यालयाची जोरदार मागणी; मनसे नेते राजू उंबरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची ज्योत मालवली श्रीमती सुमन गौतम मानकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दुःखद निधन

गुणवत्तेचा कापूस नाकारल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मनसे पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला — वणी बाजार समितीतील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

शिवगर्जनेत दुमदुमले लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल; विद्यार्थ्यांच्या दमदार सादरीकरणांनी रंगली शिवजयंती

धुलिवंदना निमित्त वणीमध्ये रंगणार भव्य हास्य कवी संमेलन; देशभरातील नामांकित कवींची उपस्थिती

Leave a Comment