ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

“यशाचा गौरव, आठवणींचा निरोप” — वणी लॉयन्स स्कूलमध्ये बक्षीस वितरण व दहावी-बारावी विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ

On: February 1, 2026 12:49 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनीधी

वणी लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नांदेपेरा रोड, वणी येथे विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्यासह इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट, पालकांची उपस्थिती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे संपूर्ण परिसरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.

शाळेत आयोजित करण्यात आलेल्या लंगडी, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल यांसारख्या क्रीडा स्पर्धांसह गीतगायन, वादविवाद, प्रश्नमंजुषा, रांगोळी, आर्ट गॅलरी, शिल्पकला आणि पुष्पसजावट आदी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि वैयक्तिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्राचार्या चित्रा देशपांडे यांनी प्रस्ताविकातून विद्यार्थ्यांना खेळातील खेळाडू वृत्ती आत्मसात करण्याचे महत्त्व पटवून दिले. “यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास या गुणांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

निरोप समारंभ हा कार्यक्रमाचा भावनिक क्षण ठरला. अनिकेत तुरानकर, आरुष खराटे, स्वरा भगत, वर्षा शाकावर, फियाना तावडे, मित बोहरा, तन्वी कवाडे आणि वैष्णवी भालेराव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रांचे सहकार्य आणि शाळेने दिलेल्या संधी याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.

शिक्षक लंकेश च्युरे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला. प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप अलोने यांनी “समाजाप्रती असलेले कर्तव्य ओळखा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करा,” असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी विद्यार्थ्यांना धैर्य, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर जीवनातील अडचणींवर मात करण्याचा संदेश दिला. “तुमच्याकडे असलेले ज्ञान आणि मूल्ये यांचा योग्य उपयोग करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवा,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लॉयन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, लॉयन्स चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष बलदेवजी खुंगर, महेंद्रजी श्रीवास्तव, चंद्रकांतजी जोवनपुत्रा, किशनजी चौधरी, रुबी जुनेजा, स्वाती बत्रा, प्रशांत गोडे, अकॅडमिक डायरेक्टर तसेच प्राचार्या चित्रा देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाली ताजने, मोनिका पायकवार आणि विजय भगत यांनी प्रभावीपणे केले, तर विजेता ठाकरे व विकास चौधरी यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद ठरले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment