ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लोहार समाजाची प्रभू श्री विश्वकर्मा जयंती वणीत हर्षोल्लासात साजरी तिरूपती मंगल कार्यालयात समाजबांधवांची मोठी उपस्थिती;

On: February 3, 2026 3:11 PM
Follow Us:
---Advertisement---

नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, चिमुकल्यांच्या नृत्याने कार्यक्रमात रंगत


✍️वणी | प्रतिनिधी

वणी येथील तिरूपती मंगल कार्यालयात लोहार समाजाच्या वतीने प्रभू श्री विश्वकर्मा जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक ३१ जानेवारी रोजी आयोजित या कार्यक्रमाला समाजातील महिला-पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक व बालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर महिला आघाडी अध्यक्षा छाया निंदेकर तसेच महिला सदस्यांनी सामूहिक आरती सादर करून वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर बाबारावजी चट्टे, विठ्ठलराव सोनटक्के, कॅप्टन महादेवराव गाताडे, भास्करराव बागळे, महादेवराव कांबळे, रमेशराव झिंगरे, मधुकरराव सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

याच कार्यक्रमात लोहार समाजाचे सदस्य तसेच नवनिर्वाचित नगरसेवक नितीन धाबेकर यांचा लोहार समाज संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

यानंतर कार्यक्रमात चिमुकल्यांनी सादर केलेल्या बहारदार नृत्यप्रस्तुतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी सर्व मुलांना चषक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी समाजबांधवांनी एकत्र येत महाप्रसादाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव शिरीष क्षीरसागर यांनी केले, तर आभारप्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष नितीन धाबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे मुख्य सल्लागार बंडू निंदेकर, अध्यक्ष नितीन धाबेकर, सचिव शिरीष क्षीरसागर, राहुल चट्टे, रवी गाताडे, प्रशांत सोनटक्के, संतोष सावरकर, संदीप वाघाडे, आकाश खंडाळकर, पवन खंडाळकर, निलेश सोनटक्के, अजय सोनवणे, तसेच महिला अध्यक्षा छाया निंदेकर, किर्ती सुर्तिकर, शितल गाताडे, अमृता चट्टे आणि इतर सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
सामाजिक एकोपा, सांस्कृतिक परंपरा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा हा कार्यक्रम लोहार समाजाच्या एकतेचे आणि संघटित शक्तीचे दर्शन घडवणारा ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment