ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अबॅकस स्पर्धेत वणीच्या विद्यार्थ्यांचा दबदबा; 20 ट्रॉफींसह ‘बेस्ट स्टुडंट’ व ‘बेस्ट टीचर’ पुरस्कारावर वणीची मोहोर

On: February 6, 2026 2:37 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनीधी

नागपूर येथील एम. के. एच. संचेती पब्लिक स्कूल येथे नागपूर जीनियस चॅम्प अकॅडमीच्या विद्यमाने नुकतीच आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय अबॅकस स्पर्धेत वणीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. ५ ते १४ वयोगटातील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाने पार पडलेल्या या स्पर्धेत वणी येथील विद्यार्थ्यांनी तब्बल २० ट्रॉफी व अनेक मेडल्स पटकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरलेला ‘बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड’ वणी येथील सानवी प्रकाश खोब्रागडे हिने पटकावला. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘बेस्ट टीचर एक्सलन्स अवॉर्ड’ हा मानाचा पुरस्कार वणीच्या जीनियस चॅम्प्स अकॅडमीच्या संचालिका सौ. अमरीन इमरान अहमद यांना प्रदान करण्यात आला. या यशामुळे वणीच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी मेंटल कॅल्क्युलेशनची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यानंतर तात्काळ निकाल जाहीर करण्यात आले. वणी येथून एकूण ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये
🔺प्रथम श्रेणी – अलिजा अली रजा अन्सारी, मुणाल संदीप भोंगाडे, रेहान जब्बार शेख, यथार्थ वसंत तलसे, सानवी प्रकाश खोब्रागडे
🔺द्वितीय श्रेणी – श्रावणी संदीप सदूरकर, अन्वय विजय नगराळे, यशस्वी रितेश वासेकर, आरोही अमोल पारखी
🔺तृतीय श्रेणी – स्वरा पंकज भडगरे, इजान ईमरान अहमद, अवनी सचिन संदुरकर, आर्या अरविंद बिंगुले, रूपासाई मल्लिकार्जुन आत्मकुरी आणि आईशा इमरान अहमद
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले, तर इतर सहभागी विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

याच कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या फास्ट टेबल रायटिंग कॉम्पिटिशनमध्ये देखील वणीच्या जीनियस चॅम्प्स अकॅडमीच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी केली. अन्वय विजय नगराळे याने अवघ्या ५ मिनिटांत १०० टाइम्स रिपीटेशन  टेबल पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला.
या यशामुळे जीनियस चॅम्प्स अकॅडमी, वणी येथील सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच संचालिका सौ. अमरीन इमरान अहमद यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या स्पर्धांमध्ये उज्वल यश संपादन करू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment