ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वेकोलीच्या वणी नॉर्थमध्ये कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण?; मनसेचा ८ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

On: February 10, 2026 5:55 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी (प्रतिनिधी):

वेकोलीच्या वणी नॉर्थ क्षेत्रात कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. केंद्र सरकारच्या किमान वेतन नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून, कंत्राटदारांकडून कामगारांना धमकावून त्यांच्या पगारातील रक्कम परत घेतली जात असल्याचा खळबळजनक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी क्षेत्रीय महाप्रबंधकांना निवेदन देत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, ८ दिवसांत ठोस पावले उचलली नाहीत तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दि ला आहे.

🎯 कागदोपत्री पूर्ण वेतन, प्रत्यक्षात कपात?

मिळालेल्या माहितीनुसार, वणी नॉर्थ परिसरातील काही कंत्राटदार कागदोपत्री कामगारांना संपूर्ण वेतन अदा केल्याचे दाखवतात. मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या बँक खात्यात पगार जमा झाल्यानंतर त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देत ठराविक रक्कम रोख किंवा ऑनलाईन स्वरूपात परत घेतली जाते. एवढेच नव्हे, तर “आम्हाला पूर्ण वेतन मिळाले आहे” असे सांगण्यास भाग पाडत त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करून घेतले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराला ‘आधुनिक गुलामगिरी’चे स्वरूप असल्याचे मनसेने निवेदनात नमूद केले आहे.

🎯 प्रशासनावर संगनमताचा आरोप

या गंभीर प्रकाराकडे वेकोलीचे कामगार अधिकारी आणि संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गोहोकार यांनी केला आहे. भ्रष्ट अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतामुळे गोरगरीब कामगारांच्या हक्कावर गदा येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

🎯 मनसेच्या प्रमुख मागण्या

🔺कामगारांचे शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकावे.

🔺जबरदस्तीने पैसे वसूल करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

🔺लुबाडलेली रक्कम व्याजासह कामगारांना परत द्यावी.

🔺कामगार अधिकारी, कंत्राटदार आणि मनसे प्रतिनिधींची तातडीने संयुक्त बैठक घ्यावी.

🔺“कारवाई न झाल्यास मनसेच्या स्टाईलने आंदोलन”

“वेकोली प्रशासनाच्या नाकाखाली कामगारांची लूट सुरू आहे. ८ दिवसांत दोषींवर कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन उभारेल. त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाला प्रशासन पूर्णतः जबाबदार असेल,” असा इशाराही फाल्गुन गोहोकार यांनी दिला.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य महाप्रबंधक (नागपूर) तसेच कामगार आयुक्तांना पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता वेकोली प्रशासन या आरोपांची कितपत दखल घेते आणि नेमकी कोणती कारवाई करते, याकडे कामगारांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

निवेदन सादर करताना फाल्गुन गोहोकार यांच्यासह विलन बोदाडकर, सूरज काकडे, धीरज बगवा, प्रवीण मांडवकर, सूरज लोंढे, गजानन बोन्डे, अमोल जेऊरकर आणि असंख्य कामगार उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment