ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

शिवजयंती निमित्त वणीत भव्य सार्वजनिक व्याख्यान; ‘शिवरायांचा सामाजिक समन्वय’ विषयावर प्रा. प्रविण देशमुख करणार मार्गदर्शन

On: February 17, 2026 3:23 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️ वणी : प्रतिनीधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंती निमित्त मराठा सेवा संघ, वणी यांच्या वतीने “छत्रपती शिवरायांचा सामाजिक समन्वय” या विषयावर भव्य सार्वजनिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिवतीर्थ (छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर), वणी येथे हा प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या व्याख्यानासाठी प्रख्यात शिवव्याख्याते व शिवचरित्र अभ्यासक प्रा. प्रविण देशमुख हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या प्रभावी व ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडल्या जाणाऱ्या शिवचरित्रामुळे उपस्थितांना प्रेरणादायी विचारांची मेजवानी मिळणार आहे. शिवरायांच्या कार्यातील सामाजिक एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि प्रजाहितदक्ष राज्यकारभार यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा या व्याख्यानाचा उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अंबादासजी वागदरकर राहणार आहेत, तर चंद्रपूर-वणी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून नगरसेवक तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ धोबे जबाबदारी सांभाळणार आहेत.

यावेळी नगराध्यक्ष विद्याताई हेमराज आत्राम यांची विशेष उपस्थिती लाभणार असून, आमदार संजयजी देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसेचे राज्यनेते राजुभाऊ उंबरकर, काँग्रेसचे महा. प्रदेश सरचिटणीस संजयजी खाडे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विजयजी चौरडीया, उपविभागीय अधिकारी सुरेश दळवे, नगरपरिषद गटनेते सुधीरभाऊ थेरे, नगरसेवक धनराज भोंगळे, स्टेट बँक वणीचे व्यवस्थापक विनोद सुभेदार, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा पौर्णिमाताई भोंगळे तसेच क्रांतिकारी सावित्रीबाई वाचनालयाचे बाळासाहेब राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दरम्यान, “सावित्री-जिजाऊ दशोत्सव २०२६” निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवविचारांचा प्रेरणादायी वारसा आत्मसात करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment