ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  वाचनालयाचे काम रखडले; जयंतीपूर्वी पूर्णत्वाची भीम आर्मी वणीची ठाम मागणी…

On: February 17, 2026 5:19 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी :  प्रतिनीधी

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करून ते नागरिकांसाठी खुले करण्यात यावे, अशी ठाम मागणी भीम आर्मी वणी विधानसभेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी, नगरपरिषद वणी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले असून, गेल्या दीड वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत असताना प्रत्यक्ष काम मात्र अर्धवट अवस्थेत थांबले असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वाचनालयाच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी मागील एक वर्षाहून अधिक काळ सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तथापि, प्रत्यक्षात केवळ काही प्राथमिक कामे करून पुढील प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह अभ्यासक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती आणि वाचनप्रेमी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

🎯 जयंतीपूर्वी वाचनालय खुले करण्याची मागणी

येत्या दोन महिन्यांत महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (१४ एप्रिल) साजरी होणार आहे. त्यानिमित्त १ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान जयंती सप्ताहाचे विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. त्यामुळे जयंतीपूर्वीच वाचनालयाचे उर्वरित काम पूर्ण करून ते जनतेसाठी खुले करण्यात यावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, जयंती सप्ताहादरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे.

🎯 प्रलंबित कामांची यादी

निवेदनात प्रशासनासमोर पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत :
🔺वाचनालयाचे शिल्लक राहिलेले बांधकाम तात्काळ पूर्ण करणे.
🔺संपूर्ण विद्युतिकरण करून पंखे, एलईडी दिवे व आवश्यक वायरिंगची व्यवस्था करणे.
🔺अभ्यासकांसाठी टेबल-खुर्च्या, कपाटे व आवश्यक फर्निचर उपलब्ध करून देणे.
🔺अद्ययावत व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून ग्रंथसंपदा समृद्ध करणे.
🔺वाचनालय परिसरातील अतिक्रमण हटवून स्वच्छता व सुशोभीकरण करणे.

🎯 विद्यार्थ्यांवर परिणाम

वणी शहरात स्वतंत्र, सुसज्ज आणि शांत अभ्यासासाठी जागेची कमतरता जाणवत आहे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, शासकीय भरती व विविध अभ्यासक्रमांची तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत वाचनालय सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना खासगी अभ्यासिका किंवा इतर पर्यायांचा आधार घ्यावा लागत असून आर्थिक भार वाढत आहे.
भीम आर्मीच्या मते, वाचनालय केवळ पुस्तके वाचण्याचे ठिकाण नसून ते सामाजिक जागृती, बौद्धिक विकास आणि सकारात्मक वातावरण निर्मितीचे केंद्र असते. त्यामुळे या प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहून विलंब न करता उर्वरित कामे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

🎯 प्रशासनाकडून तातडीच्या कार्यवाहीची अपेक्षा

प्रशासनाने या प्रकरणात जातीनिशी लक्ष घालून स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी भीम आर्मी वणी तर्फे केली आहे. तसेच कामाच्या प्रगतीबाबत पारदर्शकता ठेवून नियमित आढावा घ्यावा, असेही सुचविण्यात आले आहे.
शहरातील नागरिक, विद्यार्थी व सामाजिक संघटना आता प्रशासनाच्या ठोस निर्णयाकडे लक्ष लावून आहेत. जयंतीपूर्वी वाचनालय सुरू झाल्यास ते महामानवांना अभिवादन ठरेल, अशी भावना रवींद्र मेश्राम यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा 14 एप्रिल 2026 पासून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा भीम आर्मी वणी विधानसभा तर्फे  निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदन देतेवेळी भीम आर्मी वणी विधानसभा अध्यक्ष रवींद्र मेश्राम, तालुका अध्यक्ष हरीश पाते तसेच भीम आर्मी वणी विधानसभेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment