ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

श्री. रंगनाथ स्वामी यात्रेच्या निविदेत घोळाचा आरोप; चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

On: March 29, 2026 11:33 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनिधी

वणी नगर परिषद अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या  श्री.रंगनाथ स्वामी यात्रेच्या २०२६ च्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित कंत्राटदाराने जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे नगर परिषद वणीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे.

तक्रारीनुसार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी एका वृत्तपत्रात रंगनाथ स्वामी यात्रा २०२६ साठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या निविदा प्रक्रियेत तीन बोली प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये अश्मीर अम्युजमेंट पार्क, नागपूर (प्रोप्रायटर – हर्षद भाटी) यांची सर्वाधिक ६ लाख ३१ हजार रुपये इतकी बोली होती. दुसऱ्या क्रमांकावर पूजा अम्युजमेंट पार्क, यवतमाळ (प्रोप्रायटर – आनंद भेले) यांची ६ लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकावर लक्ष्मी अम्युजमेंट पार्क, नागपूर (प्रोप्रायटर – प्रवीण गोस्वामी) यांची ५ लाख रुपये इतकी बोली होती.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सर्वाधिक बोली असूनही नगर परिषदेकडून ती मंजूर करण्यात आली नाही. उलट त्यांनी फोन करून नगर परिषद उपाध्यक्षांच्या कार्यालयात बोलावले व या दरात यात्रा देणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यानंतर चर्चेद्वारे १० लाख रुपयांची तडजोडीची रक्कम निश्चित करण्यात आली, ज्यास तक्रारदाराने तयारी दर्शवली होती.

मात्र त्या वेळी मुख्य अधिकारी सुट्टीवर असल्याने रक्कम स्वीकारता येणार नाही, असे सांगत दुसऱ्या दिवशी पैसे भरून घेऊन आदेश देण्याचे आश्वासन देण्यात आले, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, तक्रारदाराला कोणतीही पूर्वसूचना न देता दि. ११ मार्च २०२६ रोजी एका लहानशा वृत्तपत्रात पुन्हा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली. या नव्या प्रक्रियेत फक्त एकच निविदा प्राप्त झाली असून ती पूजा अम्युजमेंट पार्क, यवतमाळ (आनंद भेले) यांची होती. दुपारी २ नंतर ही निविदा उघडून ७ लाख ५१ हजार रुपयांची बोली मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, स्वतः १० लाख रुपये भरण्यास तयार असतानाही नगर परिषदेकडून कमी दराची निविदा मंजूर करण्यात आल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली आहे.

या तक्रारीची प्रत मुख्य अधिकारी, नगर परिषद वणी, विरोधी पक्षनेते सुधीर थेरे, वणीचे आमदार संजय देरकर तसेच गटनेत्या सौ. करुणा कांबळे यांनाही पाठविण्यात आली असून आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

महामानवांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनयापन करणे हेच महामानवांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल…..न्यायाधीश जोंधळे साहेब

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त समस्त धम्म बांधवांना तसेच सर्व नागरिकांना  हार्दिक शुभेच्छा….

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त समस्त धम्म बांधवांना तसेच सर्व नागरिकांना  हार्दिक शुभेच्छा….

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त समस्त नागरिकांना  हार्दिक शुभेच्छा….

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा….

भीम टायगर सेनेतर्फे वणीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Comment