ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

भीम टायगर सेनेतर्फे वणीत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

On: April 10, 2026 8:16 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनिधी

विश्वरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वणी शहरात भीम टायगर सेनेतर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भीम गीतांचा भव्य कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीचा संदेश देणारी गीते सादर केली जाणार असून, समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

याच दिवशी रात्री ११.५५ वाजता जयंतीचे औचित्य साधत भव्य केक कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन  आयोजक योगेश भाऊ रायपुरे जिल्हाध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ जिल्हा, आनंदकुमार शेंडे जिल्हा संघटक भिम टायगर सेना तसेच राज घायवण वणी विभागीय अध्यक्ष भिम टायगर सेना  आणि समस्त भिम टायगर सेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेआहे.

तसेच दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी 12:00 वाजता बस स्थानकासमोर  धम्मभोजनाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. साय. 6:30 वाजता सर्व रॅलीचे भव्य स्वागत व सत्कार सोहळा आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आला आहे.

समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन भीम टायगर सेवा, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment