ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

महामानवांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनयापन करणे हेच महामानवांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल…..न्यायाधीश जोंधळे साहेब

On: April 14, 2026 4:52 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी / प्रतिनिधी  :-

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य कोणत्या एका विशिष्ट समाज किंवा जात विरोधी नव्हते तसेच कोणत्या एका विशिष्ट जात समूहाकरिता सुद्धा नव्हते त्यांचा लढा कायमच जातीय सामाजिक विषमते विरुद्ध राहिलेला आहे. या महापुरुषांचे कार्य हे सततच सर्व समाज घटकाच्या उन्नती करिता होते मात्र अलीकडच्या काळामध्ये या महापुरुषांना त्यांच्या त्यांच्या जाती धर्मामध्ये गुंफून ठेवण्याचा प्रयत्न होतोय त्याला निश्चितच प्रतिकांतीचा काळ म्हणावे लागेल असे झाले तर या महामानवांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला अर्थ उरणार नाही,

त्यामुळे समाज घाटकांनी या महामानवांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनयापन करणे हेच महामानवांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल, असे मत वणी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमान पी.एस जोंधळे साहेब यांनी वणी वकील संघाच्या वतीने आयोजित बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना व्यक्त केले.

ते पुढे असेही म्हणाले की, वकील हे जागृत आणि बुद्धीजीवी समाज घटक असल्याने समाज प्रबोधनाचा वसा निरंतर चालू ठेवला पाहिजे!
     बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून वणी वकील संघाच्या वतीने आज दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर वणी येथील बार रूम मध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमान जोंधळे साहेब होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सह न्यायाधीश भोसले साहेब, दुसरे सह न्यायाधीश बिरादर साहेब, तसेच वणी वकील संघाचे अध्यक्ष ऍड.वीरेंद्र महाजन, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.वसंतराव कवाडे हे उपस्थित होते.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीज्योती ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला वणी वकील संघाचे अध्यक्ष ऍड वीरेंद्र महाजन, ऍड वसंतराव कवाडे, ऍड रेखा तेलंग, ऍड अमोल टोंगे यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. अटर्णी हितेश मजगवळी यांनी भीम गीत सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
  

वणी वकील संघाचे अध्यक्ष ऍड.वीरेंद्र महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील साहित्य वणी वकील संघाच्या ग्रंथालयाला भेट देण्याची इच्छा दर्शवली जेणेकरून सर्व वकिलांना, कायद्याच्या अभ्यासासोबतच महामानवाच्या जीवनाचा अभ्यास करता येईल.
 

या कार्यक्रमाला वणी वकील संघाचे  कार्यकारणी सदस्य ऍड दिलीप परचाके, उपाध्यक्ष ऍड.यशवंत बर्डे, ऍड.विप्लव तेलतुंबडे, ऍड.मिलिंद निमजे, ऍड.रामेश्वर लोणारे, ऍड निलेश चौधरी, ऍड,राहुल दानव, ऍड.चंदू भगत, ऍड रेखा तेलंग, ऍड.दुष्यंत बोरुले, ऍड.बोरुले, ऍड जुगलकिशोर मुलचंदजी तुगनायत,आदि उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघांचे सचिव ऍड अमोल टोंगे यांनी केले..

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

वणीतील दिकुंडवार इंग्लिश ट्युशन क्लासेसचा दैदिप्यमान निकाल शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; माफक फी मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम

संतभूमीत वणीच्या लेखकाचा गौरव संत काशीबा गुरव महाराजांवरील संशोधनासाठी सुनील ठाकरे यांचा पंढरपुरात सत्कार ‘रिंगण’ विशेषांकासाठी सुरू सखोल अभ्यास; आषाढी एकादशीला विशेषांकाचे होणार प्रकाशन

अवैध गोवंश वाहतुकीवर शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई कंटेनरमधून ३४ बैलांची सुटका; २६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

उकणी कोळसा खाण दुर्घटनेची काँग्रेसकडून पाहणी खा.प्रतिभाताई धानोरकर व संजय खाडे यांनी WCL प्रशासनाला धारेवर धरले; कामगार सुरक्षा, पुनर्वसन आणि स्थानिकांना रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर

वणी तालुक्यात पीक विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा संताप उफाळला “नुकसान स्पष्ट असताना भरपाई नाकारणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक”; भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा दणदणीत निकाल, एस.एस.सी. परीक्षेत १०० टक्के यश; अनिकेत तुराणकर तालुक्यात द्वितीय

Leave a Comment