ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

भिम आर्मीचा संघटन मजबुती व जनजागृती दौरा

On: April 30, 2026 2:15 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी :  प्रतिनीधी


सामाजिक न्याय, संविधानिक हक्कांचे संरक्षण आणि संघटन मजबुती या उद्देशाने भिम आर्मीचा महाराष्ट्रभर जनजागृती दौरा सुरू असून, या दौऱ्याचा एक महत्त्वाचा टप्पा वणी येथे पार पडणार आहे. भिम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोकजी कांबळे, प्रदेश प्रभारी शंकरजी मून तसेच प्रदेश संघटक अशोकजी भालेराव यांच्या नेतृत्वात हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी वणी येथे आगमन होणार असून, त्यानंतर 1 मे 2026 (शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता वणी येथील विश्रामगृह येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून, आगामी रणनीती, संघटन विस्तार आणि सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

भिम आर्मीच्या वतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

🎯 मुख्य मुद्दे व मागण्या :
🔺एससी/एसटी आरक्षणाचे वर्गीकरण तात्काळ थांबविण्यात  यावे
🔺संविधानिक अधिकारांचे संरक्षण व स्वसंरक्षण सुनिश्चित करावे
🔺“आरक्षण वाचवा, संविधान वाचवा” हा संदेश व्यापक पातळीवर पोहोचवावा
जिल्हाध्यक्ष रवींद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम यांनी या दौऱ्याच्या अनुषंगाने सर्व संबंधितांना वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, या बैठकीमुळे स्थानिक पातळीवरील प्रश्न मांडण्यासाठी आणि संघटन अधिक सक्षम करण्यासाठी नवी दिशा मिळणार आहे.
दरम्यान, या दौऱ्यामुळे वणी परिसरात सामाजिक व राजकीय पातळीवर चैतन्य निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, विविध घटकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता वाढली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment