ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मराठी विज्ञान परिषद, वणीची सर्वसाधारण सभा व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

On: May 6, 2026 8:20 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी / प्रतिनिधी


वणी येथे मराठी विज्ञान परिषद, वणी विभाग (संलग्न मुंबई) यांच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा व बक्षीस वितरण समारंभ येथील श्रीमती नुसाबाई चोपणे विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विभागाचे अध्यक्ष प्रा. महादेव खाडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यवाह लक्ष्मण ईददे, कार्याध्यक्ष प्रशांत गोडे, कोषाध्यक्ष संजय देवाळकर व स्नेहलता चुंबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यवाह लक्ष्मण ईददे यांनी वार्षिक अहवाल सादर करताना परिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. राष्ट्रीय गणित दिनानिमित्त महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच गणेशोत्सव जनजागृती, दिवाळीतील फटाका प्रदूषण, होळी व रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंगनिर्मिती यांसारख्या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती देण्यात आली.

यावेळी २०२५-२६ या वर्षात घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. खुल्या गटात ‘अवयव दान’ तर विद्यार्थी गटात ‘मोबाईलपासून मैदानाकडे’ या विषयांवर स्पर्धा घेण्यात आली होती.

या स्पर्धेत कु. आरोही प्रमोद ढेंगळे यांनी प्रथम, कु. श्वेता कैलास उईके यांनी द्वितीय तर कु. सौंदर्या सुरेश कुळसंगे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच कु. संजना हेमंत मोहितकर व कु. नव्या शंकर खामनकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

तसेच कार्यक्रमात मान्यवरांनी विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रारंभी विजय गंधेवार यांनी विज्ञान गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.

प्रास्ताविक संजय देवाळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भारत गारघाटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक विनोद जेनेकर, प्रकाश गारघाटे, सुनील कोंगरे, डी. जे. गोहोकार, वैजनाथ खडसे, अश्विनी ढेंगळे, धुंडीबाल धानोरकर तसेच विद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment