ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणी लायन्स ज्युनिअर विज्ञान कॉलेजचा दमदार निकाल; ९४.४४% यशाने उंचावली मान!

On: May 7, 2026 2:38 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी प्रतिनिधी


वणी शहरातील लायन्स इंग्लिश मिडीयम (विज्ञान) ज्युनिअर कॉलेजने एच.एस.सी. फेब्रुवारी २०२६ परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत ९४.४४ टक्के निकाल लावला आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन आणि संस्थेची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरा यामुळे हा भक्कम यशाचा टप्पा गाठला गेला.

या निकालात कु. मानसी भारत लिपटे हिने ७९.८३% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत कॉलेजचे नाव उज्ज्वल केले. कु. कुमुदिनी हेमंत जोगी हिने ६३.३३% गुणांसह द्वितीय, तर रोशन तुकाराम माथनकर याने ६१.१७% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, तसेच संचालक मंडळ, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या जिद्दीला आणि शिक्षकांच्या समर्पणाला लाभलेले हे यश, भविष्यातील आणखी मोठ्या कामगिरीची नांदी ठरत आहे.

AI generated photo

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment