ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूलचा दणदणीत निकाल, एस.एस.सी. परीक्षेत १०० टक्के यश; अनिकेत तुराणकर तालुक्यात द्वितीय

On: May 8, 2026 10:57 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील आपली गौरवशाली परंपरा कायम राखत येथील वणी लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल ने एस.एस.सी. (फेब्रुवारी २०२६) परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल कामगिरी नोंदविली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या परीक्षेत अनिकेत मधुकर तुराणकर याने ९६.६० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला असून तालुक्यात द्वितीय येण्याचा मानही मिळविला आहे. कु. वैष्णवी नितीन भालेराव हिने ९६.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक तर आरूष सुधीर खराटे याने ९६.०० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला.

यंदा शाळेतील एकूण १६३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७० विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळविली आहे. विशेष म्हणजे १४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून शाळेचा नावलौकिक वाढविला. तसेच ५५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, संचालक मंडळ, अकॅडेमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्याची जोड लाभल्यानेच हे यश शक्य झाले, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment