ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणीत वेकोलीच्या कोळसा वाहतुकीचा कहर; धुळीमुळे पिकांचे नुकसान, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर — मनसेचा आंदोलनाचा इशारा

On: May 27, 2026 2:08 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी प्रतिनीधी

वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड च्या (वेकोली) खाणींतून होणाऱ्या बेजबाबदार कोळसा वाहतुकीमुळे वणी तालुक्यातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले असून, पिकांचे नुकसान, प्रदूषण आणि वाढत्या आरोग्य समस्यांबाबत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने प्रशासनाला दिला आहे.

मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेकोलीच्या खाणींतून दररोज मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक केली जाते. मात्र अनेक अवजड वाहने ताडपत्री न लावता आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत भरधाव धावत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कोळशाची धूळ उडत आहे. ही धूळ रस्त्यालगतच्या शेतांमध्ये साचत असल्याने पिकांची गुणवत्ता खालावत असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

विशेषतः मूंगोली, कोळगाव, साखरा, शिवनी, येनक, येनाडी आणि शिंदोला परिसरातील शेतकरी या समस्येमुळे गंभीर संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या मते, धुळीमुळे पिकांचे उत्पादन घटत असून फळभाज्या व इतर पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

दरम्यान, कोळसा खाण परिसरातील नागरिकांनाही प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे. धुळीमुळे श्वसनाचे विकार, त्वचारोग, डोळ्यांचे आजार तसेच हृदयविकाराच्या समस्या वाढत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांसह कायमस्वरूपी दवाखाना सुरू करावा, तसेच प्रभावित नागरिकांना दरवर्षी १० हजार रुपयांचा ‘वैद्यकीय भत्ता’ देण्यात यावा, अशी मागणी मनसेने केली आहे.

याशिवाय बाधित शेती आणि पिकांचे नव्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

हे निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश पेचे यांच्यासह महेश हादगावकर, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, रणजीत बोंडे, साई युगे, मनोज उरकुडे, प्रवीण कळस्कर, प्रदीप बदकल, बबन बदखल, मारुती मिलीमिले, संजय पंडिले, अशोक दातारकर, पांडुरंग मिलीमिले, गणेश पंडिले, कवडू गोखरे, काशिनाथ मडावी, सुनील चौधरी, नामदेव उइके, श्रीकृष्ण पानघाटे, संजय बदकल, पंकज ढवळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अयोध्या श्रीराम मंदिर देणगी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; वणीत रामरक्षा आंदोलन व महाआरतीतून रामभक्तांची मागणी

राजूरमधील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; वेकोली प्रशासन व ठेकेदाराला २४ तासांचा अल्टिमेटम

बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात मनसे आक्रमक; फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात कृषी विभागाला निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वणीतील MHT-CET तयारीसाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंती –   क्रिष्णा मास्टर्स अकॅडमी,

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला वणीत तीव्र विरोध; प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची संविधान जागर सन्मान मंच, वणीची  मुख्यमंत्र्याकडे मागणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला यश; 15 दिवसांत समितीचा अहवाल, जमीन संपादनावर सकारात्मक निर्णयाचे WCL प्रशासनाचे आश्वासन

Leave a Comment