ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणी बसस्थानक परिसरात गोदावरी अर्बन मल्टीस्टेटकडून सिमेंट बेंचेसचे लोकार्पण

On: May 28, 2026 4:58 PM
Follow Us:
---Advertisement---

9 व्या वर्धापन दिनानिमित्त समाजसेवेचा आदर्श; प्रवासी व नागरिकांना बसण्याची सुविधा

✍️वणी : प्रतिनीधी


सहकार क्षेत्रासोबत सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांच्या वणी शाखेचा 9 वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त वणी बसस्थानक परिसरात प्रवासी व नागरिकांच्या सोयीसाठी सिमेंटच्या बैठक बेंचेसचे लोकार्पण करण्यात आले.

या उपक्रमामुळे बसस्थानक परिसरात नागरिकांना बसण्याची सुविधा उपलब्ध झाली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. संस्थेच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाला एजीएम रवी इंगळे, माजी नगराध्यक्ष राकेशभाऊ खुराणा, वणी आगार प्रमुख लता मुळेवार, वाहतूक निरीक्षक जयश्री मेश्राम तसेच लेखाधिकारी कुंतीलालजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

गोदावरी अर्बन वणी शाखेने यशस्वीपणे 9 वर्षांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल शाखेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष ना. हेमंतभाऊ पाटील, अध्यक्षा सौ. जयश्रीताई पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सर्व संचालक, दवे मॅडम, विजय शिरमेवार तसेच सहाय्यक महाव्यवस्थापक रवी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

एजीएम रवी इंगळे यांच्या विशेष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सिमेंट बेंचेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वणी शाखेचे व्यवस्थापक विजय मोडक, सुनील चिंचोळकर, सौ. प्रांजली ठाकरे, अक्षय अने, रवींद्र लोथे, अर्पणा केदार, विद्या निंबाळकर, अमोल देऊळकर, मंगेश करंडे, आतिश बुरेवार, जयवंत ओचावार तसेच दैनिक आवर्ती ठेव अभिकर्ते, ठेवीदार, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🎯 उपक्रमाची वैशिष्ट्ये

🔺वणी बसस्थानक परिसरात नागरिकांसाठी कायमस्वरूपी बसण्याची सुविधा

🔺सामाजिक बांधिलकी जपत संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम

🔺प्रवासी व ज्येष्ठ नागरिकांना विशेष दिलासा

🔺वर्धापन दिन समाजसेवेतून साजरा करण्याचा अभिनव उपक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment