ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अयोध्या श्रीराम मंदिर देणगी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; वणीत रामरक्षा आंदोलन व महाआरतीतून रामभक्तांची मागणी

On: July 12, 2026 4:36 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी : प्रतिनिधी

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील कथित देणगी अपहार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी वणी येथील रामभक्तांनी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा आंदोलन’ आणि सामूहिक महाआरतीच्या माध्यमातून केली. ऐतिहासिक श्रीराम मंदिर परिसरात झालेल्या या आंदोलनात शेकडो रामभक्त, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला.

जागृती मारोती मंदिर, आंबेडकर चौक येथे आयोजित कार्यक्रमात आमदार संजय देरकर यांनी प्रभू श्रीरामांची महाआरती करून श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच सत्य जनतेसमोर यावे, अशी प्रार्थना केली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार संजय देरकर म्हणाले की, “प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण झालेला निधी हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धा, विश्वास आणि भावनांचे प्रतीक आहे. या निधीबाबत निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच मंदिरासाठी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या चांदीच्या वीटा आणि अन्य मौल्यवान वस्तूंशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या दाव्यांचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून धर्मरक्षण, पारदर्शकता आणि जनविश्वास कायम राखण्यासाठी आहे.”

या आंदोलनात सहजिल्हाप्रमुख संजय निखाडे, सौ. किरण देरकर, शहरप्रमुख विनोद ढुमणे, तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, नगरपरिषद गटनेते सुधीर थेरे, पंढरी राजुरकर, सचिन कुचणकर, मंगेश मोहितकर, सत्यवान महाकुलकर, दिवाकर उरकुंडे, सौ. टीमनताई टोंगे, सौ. कीर्तीताई देशकर, सौ. सविता आवारी, मोरेश्वर उज्वलकर, अनिकेत बदखल, राजू पाटील, प्रकाश कराड, सुरेशराव देशकर, डॉ. जगन जूनघरी, कुंदन टोंगे, महेश सोमलकर, किशोर मोहेवार यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रभू श्रीरामांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता सामूहिक महाआरतीने झाली. यावेळी उपस्थित रामभक्तांनी श्रीराम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

जिल्हा परिषदेचा रस्ता गिळंकृत? WCL विरोधात मनसे आक्रमक; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर मनसेची संघटनात्मक मोर्चेबांधणी; वणी ते अमरावतीत राजू उंबरकर यांच्या बैठकींचा धडाका

एसटीच्या ढिसाळ कारभारावर मनसेची कृतीतून चपराक; चनोडा–मारेगाव मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू

राजूरमधील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; वेकोली प्रशासन व ठेकेदाराला २४ तासांचा अल्टिमेटम

बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात मनसे आक्रमक; फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात कृषी विभागाला निवेदन, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वणीतील MHT-CET तयारीसाठी विद्यार्थी व पालकांची पहिली पसंती –   क्रिष्णा मास्टर्स अकॅडमी,

Leave a Comment