ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवड्यात पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी नेली जाणारी २७ जनावरे मुक्त; ₹२९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपींवर गुन्हे

On: July 14, 2026 1:12 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा (अशफाक खान)

14 जुलै रोजी पांढरकवडा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे  दोन धडक कारवाई करत कत्तलीसाठी तेलंगणातील हैदराबादकडे अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली २७ जनावरे मुक्त केली. या कारवाईत दोन मालवाहू वाहने जप्त करण्यात आली असून जनावरे, वाहने असा एकूण ₹२९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे कर्तव्यावर असताना पोलीस हवालदार राम राठोड व पोलीस हवालदार सुनिल कुंटावार यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार पिकअप वाहन क्रमांक TS-16 UB-2076 मध्ये गोवंशीय जनावरे तसेच ट्रक क्रमांक TS-12 UD-3408 मध्ये म्हशी व बछडे आखूड दोरीने बांधून, चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत अमानुष व निर्दयपणे कोंबून नागपूरकडून हैदराबादच्या दिशेने कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असल्याचे समोर आले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून दोन्ही वाहने अडवली. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या जप्ती पंचनाम्यात वाहनांची तपासणी केली असता, जनावरांची अत्यंत क्रूर अवस्थेत वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी  पहिल्या कार्यवाहीत ४ गोवंशीय बैल तसेच दुसऱ्या कार्यवाहीत २३ म्हशी व बछडे, अशी एकूण २७ जनावरे ताब्यात घेतली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोन्ही वाहने जप्त करण्यात आली.

मुक्त करण्यात आलेल्या जनावरांची सुरक्षितता आणि योग्य देखभाल व्हावी यासाठी त्यांना नगर परिषद कोंडवाडा, पांढरकवडा येथे ठेवण्यात आले असून त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी  पहिल्या कार्यवाहीत आकाश पोचीराम दुधबावने (वय २७, रा. पिंपळखुटी, ता. केळापूर)आणि दुसऱ्या कार्यवाहीत अजय कैलास राय (वय ४७, रा. बारवे), धर्मेंद्र दिनेश राय (वय ३३, रा. गौसपूर) आणि रौशनकुमार सुग्रीव राय (वय २२, रा. ब्रम्हचारी पोखरा, बिहार) यांच्याविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, सहाय्यक फौजदार प्रमोद जुनुनकर, पोलीस हवालदार राम राठोड, सुनिल कुंटावार तसेच नाईक पोलीस कॉन्स्टेबल सुनिल राठोड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या कारवाईमुळे अवैध जनावरांच्या वाहतुकीवर मोठा आळा बसला असून, जनावरांची क्रूरतेने वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणारअसल्याचे दिसुन येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पेपरफुटीविरोधात पांढरकवड्यात युवा टायगर फोर्सचा एल्गार; शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा

दोन बैल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश; पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई, 6 आरोपी जेरबंद – ₹10.05 लाखांचा मुद्देमाल जप्त

मोहदा येथे 97 .50 लाखांचा दरोडा; ‘राजेंद्र ज्वेलर्स फोडले, चार मुखवटाधारी चोरटे दुचाकीवरून पसार

ऐतिहासिक पायी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; युवा टायगर फोर्सच्या जनजागृतीमुळे तालुकाभर भक्तिमय वातावरण, विविध समित्यांची घोषणा

सहा.पोलिस अधिक्षक रॉबिन बन्सल यांच्या पथकाची मोठी कारवाई; कत्तलीसाठी हैदराबादकडे नेली जात असलेली २० गोवंश जनावरे व ५ पिकअप वाहने जप्त, ७ आरोपींवर गुन्हे दाखल

पांढरकवडा पोलिसांकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; आरोपीला कोरपना जि.चंद्रपूरातून अटक

Leave a Comment