ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

कायद्याची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचणे गरजेचे : पोलीस अधिकाऱ्यांचा सूर

On: September 22, 2026 9:09 AM
Follow Us:
---Advertisement---

विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने पांढरकवड्यात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात

✍️पांढरकवडा: अशफाक खान


नागरिकांना कायद्याची मूलभूत माहिती मिळावी, आपल्या हक्कांसोबतच कर्तव्यांची जाणीव व्हावी आणि बदलत्या कायद्यांबाबत समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा श्री. रॉबिन बन्सल होते. प्रमुख उपस्थितीत पोलीस स्टेशन पांढरकवड्याचे ठाणेदार श्री. लहुजी तावरे, अॅड. खुशाल शेंडे, नगर परिषद पांढरकवड्याचे उपनगराध्यक्ष आतिश चव्हाण, नगरसेवक स्वप्नील उप्पलवार, नगरसेविका रेखा ताई चितार्लेवार तसेच करीम मामू यांची उपस्थिती होती.

शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना कायद्याचे पालन, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, पोलीस प्रशासनाची भूमिका, कायदेशीर बाबींमध्ये घ्यावयाची दक्षता तसेच विविध कायद्यांबाबत आवश्यक मार्गदर्शन केले. समाजातील प्रत्येक घटकाला कायद्याची माहिती असणे ही काळाची गरज असून, कायद्याची माहिती असल्यास नागरिकांना अनेक अडचणींपासून दूर राहता येते, असे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अजय कोटेवार यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन दानिश शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विघ्नहर्ता गणेश मंडळाचे उपाध्यक्ष शाहिद तवर, आकाश कोटेवार, सत्यम पद्मगिरवार, कार्तिक नामदेववार, निखिल गूंजेवार, कृष्णा गूंजेवार यांच्यासह वॉर्डातील नागरिकांनी परिश्रम घेतले.

विघ्नहर्ता गणेश मंडळाने धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसोबतच सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांना प्राधान्य देत नागरिकांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी घेतलेला पुढाकार उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला. कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना कायद्याची माहिती मिळण्याबरोबरच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यासही मदत झाली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment