ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

पांढरकवडा पोलिसांचा मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना छडा; चार दुचाकी जप्त

On: September 23, 2026 11:18 AM
Follow Us:
---Advertisement---

झरी तालुक्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; चोरीच्या वाहनांची एकूण किंमत ८० हजार रुपये

✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा शहरासह परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या शोधमोहीमेला यश आले असून, मोटारसायकल चोरीच्या विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस स्टेशन पांढरकवडा येथे मोटारसायकल चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक १११७/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता तसेच गुन्हा क्रमांक ९७७/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू होता.

दरम्यान, चोरीस गेलेल्या मोटारसायकली तसेच संबंधित आरोपीचा शोध घेण्यासाठी पांढरकवडा पोलिस स्टेशनच्या डी.बी. पथकाला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक नितीन सुशीर यांच्या डी.बी.पथकाने गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले. तसेच पांढरकवडा शहर व परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरीच्या वाहनांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुकेश माधवराव आत्राम (वय ३०), रा. बंदी वाढोणा, ता. झरी, जि. यवतमाळ याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटारसायकली मिळून आल्या. पोलिसांनी सदर वाहने जप्त करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

जप्त करण्यात आलेली वाहने

अ.क्र. पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक वाहन क्रमांक किंमत

१ पोलीस स्टेशन पांढरकवडा १११७/२०२६ MH 27 N 0094 ₹१०,०००
२ पोलीस स्टेशन पांढरकवडा ९७७/२०२६ MH 32 AF 3426 ₹३५,०००
३ पोलीस स्टेशन राळेगाव २३३/२०२३ MH 29 P 8996 ₹२०,०००
४ पोलीस स्टेशन आदिलाबाद-०१ ४४०/२०२५ TS 09 EA 6584 ₹१५,०००

अशा प्रकारे पोलिसांनी चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करून एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे पांढरकवडा तसेच लगतच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यवतमाळ, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, यवतमाळ, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, सफौ. प्रमोद जुनूनकर, पोलीस हवालदार विलास गाधव, नापोकॉ. सुनील राठोड, सचिन काकडे आणि पोलीस शिपाई राजू मुत्यालवार यांनी सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास सफौ. आनंद अलचेवार आणि म.ना.पो.शि. जया रोगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment