ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

मोहदा येथे 97 .50 लाखांचा दरोडा; ‘राजेंद्र ज्वेलर्स फोडले, चार मुखवटाधारी चोरटे दुचाकीवरून पसार

On: July 15, 2026 2:11 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा: अशफाक खान


पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथील मज्जिद वार्ड परिसरातील नामांकित ‘राजेंद्र ज्वेलर्स’ या सराफा दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर धाडसी दरोडा टाकत अवघ्या २० मिनिटांत तब्बल ९७ लाख ५० हजार रुपयांचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनातही मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र श्रीमल्ल वर्मा (वय ६१, रा. मज्जीद  वार्ड, मोहदा) हे गेल्या सुमारे ५० वर्षांपासून आपल्या घरालगत ‘राजेंद्र ज्वेलर्स’ हे सराफा दुकान चालवित आहेत. मंगळवार (१४ जुलै) रोजी रात्री सुमारे ७ वाजता त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून कुलूप लावले.

बुधवारी (१५ जुलै) पहाटे सुमारे ४.३० वाजता शेजारी अब्दुल राजवानी हे नमाजासाठी मशिदीकडे जात असताना दुकानाचे शटर अर्धवट उघडे व कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने राजेंद्र वर्मा यांना याची माहिती दिली. दुकान उघडून पाहणी केली असता कपाटे, ड्रॉवर व तिजोरी फोडून सर्व मौल्यवान ऐवज चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

🎯 सीसीटीव्हीत कैद; २० मिनिटांत संपूर्ण चोरी

घटनेनंतर राजेंद्र वर्मा यांचे सुपुत्र अंशित वर्मा यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये पहाटे ४.०५ ते ४.२५ या अवघ्या २० मिनिटांच्या कालावधीत चार अज्ञात व्यक्ती तोंडाला काळे व निळे मास्क आणि हातात ग्लोव्हज घालून दुकानात प्रवेश करताना दिसत आहेत. चोरी करून हे चौघेही दुचाकीवरून पसार झाल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे.

🎯 ९७.५० लाखांचा ऐवज लंपास

चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम, तसेच मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आहेत.

सोन्याचे दागिने :

– शॉर्ट पोत – ४ नग (₹४.५० लाख)

– गोफ व भोपीचेन – ८ नग (₹१२ लाख)

– राणीहार (₹२.२५ लाख)

– नेकलेस (₹१.२५ लाख)

– कानवेल – ४ जोड (₹२ लाख)

– डोरले – ३२ नग (₹४.५० लाख)

– टॉप्स, एअरिंग, झुमके – ५० जोड (₹१३.५० लाख)

– जेन्ट्स व बदामी अंगठ्या (₹९ लाख)

– ओम लॉकेट – ६२ नग (₹६ लाख)

– कानातील रिंग (₹४ लाख)

– तसेच इतर विविध सोन्याचे दागिने.

चांदीचे दागिने :

– पायातील जाड कडे – ३ किलो (₹६ लाख)

– चांदीचे पाटले – ३ किलो (₹६ लाख)

– बाहुटे व गळ्यातील साखळ्या – ३.५ किलो (₹७ लाख)

– जोडवे व मुलांचे कडे – ३ किलो (₹६ लाख)

– जेन्ट्स कडे – ३ किलो (₹६ लाख)

– देव-देव्हाऱ्यातील चांदीचे साहित्य – ३ किलो (₹६ लाख)

एकूण चोरीचा ऐवज : ₹९७,५०,०००.

🎯 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबिन बंसल, पांढरकवडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार लहू तावरे, श्वान पथक व फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपास पथकाला आवश्यक सूचना देण्यात आल्या असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि परिसरातील इतर कॅमेऱ्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.

🎯 अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा

राजेंद्र वर्मा यांच्या फिर्यादीवरून पांढरकवडा पोलिस ठाण्यात अज्ञात चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३०५, ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

🎯 यापूर्वीही मोहद्यात घरफोडी

विशेष म्हणजे, २८ जून २०२६ रोजी मोहदा येथील हनुमान वार्ड परिसरात राहणारे सुखदेव दोनाडकर यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व ₹५० हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. त्या घरफोडीचा अद्याप उलगडा झालेला नसतानाच आता सराफा दुकानावर झालेल्या या मोठ्या दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्यापाऱ्यांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पेपरफुटीविरोधात पांढरकवड्यात युवा टायगर फोर्सचा एल्गार; शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा

दोन बैल चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश; पांढरकवडा पोलिसांची मोठी कारवाई, 6 आरोपी जेरबंद – ₹10.05 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऐतिहासिक पायी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; युवा टायगर फोर्सच्या जनजागृतीमुळे तालुकाभर भक्तिमय वातावरण, विविध समित्यांची घोषणा

पांढरकवड्यात पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीसाठी नेली जाणारी २७ जनावरे मुक्त; ₹२९.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपींवर गुन्हे

सहा.पोलिस अधिक्षक रॉबिन बन्सल यांच्या पथकाची मोठी कारवाई; कत्तलीसाठी हैदराबादकडे नेली जात असलेली २० गोवंश जनावरे व ५ पिकअप वाहने जप्त, ७ आरोपींवर गुन्हे दाखल

पांढरकवडा पोलिसांकडून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत; आरोपीला कोरपना जि.चंद्रपूरातून अटक

Leave a Comment