ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

आ. संजय देरकर यांच्या पुढाकारातून विठ्ठलवाडीत भव्य मोफत आरोग्य शिबिर; १७० नागरिकांची तपासणी, औषधांचे विनामूल्य वितरण

On: July 20, 2026 3:52 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️ वणी : प्रतिनिधी

सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (वेकोली) वणी नॉर्थ क्षेत्राच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत विठ्ठलवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य निःशुल्क सर्वसाधारण आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार संजय देरकर यांच्या विशेष पुढाकारामुळे हे शिबिर अत्यंत नियोजनबद्ध, प्रभावी आणि लोकाभिमुख पद्धतीने पार पडले.

शिबिरामध्ये सुमारे १७० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांचे निदान करून आवश्यक औषधे पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिली. याशिवाय मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, हंगामी आजार, पोषण, वैयक्तिक स्वच्छता तसेच नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर विशेष भर देत निरोगी जीवनशैलीचा संदेशही देण्यात आला.

या आरोग्य शिबिराला आमदार संजय देरकर, वेकोलीचे जनरल मॅनेजर (ऑपरेशन) ओमप्रकाश फुलारे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश रंगणे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

वैद्यकीय सेवेसाठी डॉ. किशन, डॉ. मालविका, डॉ. पवार, डॉ. नरेश तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार, सल्ला आणि औषधांचे वितरण केले. संपूर्ण शिबिरादरम्यान वैद्यकीय पथकाने प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक मार्गदर्शन करत आरोग्याबाबत जनजागृती केली.

शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये वेकोली प्रशासन, वैद्यकीय विभाग, मानव संसाधन विभाग, गुरुदेव सेवा मंडळ आणि स्थानिक स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच नगरसेवक प्रणाली देऊळकर आणि अजय धोबे यांनी शिबिराच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना आमदार संजय देरकर म्हणाले, “ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. वेकोलीच्या CSR माध्यमातून राबविण्यात येणारे असे उपक्रम समाजहितासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. भविष्यातही नागरिकांच्या आरोग्य हिताला सर्वोच्च प्राधान्य देत अशा उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.”

स्थानिक नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आयोजकांचे आभार व्यक्त केले. अशा प्रकारची मोफत आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील नागरिकांना सहज, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले. आमदार संजय देरकर यांच्या जनहितवादी दृष्टीकोन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि लोकसेवेच्या बांधिलकीमुळे हा उपक्रम केवळ आरोग्य तपासणीपुरता मर्यादित न राहता जनतेच्या आरोग्य संरक्षणासाठी प्रभावी लोककल्याणकारी अभियान ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लेखणीचा योद्धा, कलेचा प्रवासी आणि विचारांचा दीपस्तंभ – डॉ. विनोदकुमार आदे

जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ वणीत काँग्रेसचे आंदोलन; निष्पक्ष चौकशी, दोषींवर कारवाईची मागणी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला वणीतून जोरदार पाठिंबा; राष्ट्रपतींना एसडीओंमार्फत निवेदन, सोनम वांगचुक यांच्या ताब्याचा निषेध

जिल्हा परिषदेचा रस्ता गिळंकृत? WCL विरोधात मनसे आक्रमक; दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

निवडणूक आयोगाच्या ‘SIR’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर मनसेची संघटनात्मक मोर्चेबांधणी; वणी ते अमरावतीत राजू उंबरकर यांच्या बैठकींचा धडाका

एसटीच्या ढिसाळ कारभारावर मनसेची कृतीतून चपराक; चनोडा–मारेगाव मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू

Leave a Comment