ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला केळापूर वकील संघाचा जाहीर पाठिंबा; लाठीचार्जच्या निषेधार्थ राष्ट्रपतींना निवेदन

On: July 24, 2026 2:44 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा :  अशफाक खान


दिल्ली येथील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या  लाठीचार्ज व अमानुष मारहाणीचा निषेध नोंदवत वकील संघ, केळापूर यांच्या वतीने आज दि. 24 जुलै रोजी महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, केळापूर यांच्या मार्फत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

वकील संघाने दिलेल्या निवेदनात देशातील शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा, विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले की, भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार आहे. न्यायव्यवस्थेचे घटक म्हणून विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वकील संघाने जाहीर पाठिंबा दर्शविला.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, देशाच्या विविध भागांतून जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून  करण्यात आलेल्या लाठीचार्ज व मारहाणीमुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त समोर आले असून, अशा प्रकारच्या कारवाईमुळे लोकशाही मूल्यांना धक्का बसतो. या घटनेचा वकील संघाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

🎯 वकील संघाच्या प्रमुख मागण्या

🔺आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्यात यावी.

🔺विद्यार्थ्यांच्या सर्व न्याय्य मागण्यांची गंभीरपणे दखल घेऊन त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा.

🔺अमानुष मारहाण करणाऱ्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

🔺संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

🔺आंदोलनात उपद्रव निर्माण करणाऱ्या दोषी घटकांवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करू नयेत, कारण देशातील युवा विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी.

वकील संघाने आपल्या निवेदनातून लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार अबाधित राखण्याची गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना संवेदनशीलतेने प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.

यावेळी अॅड. राशिद शेख (अध्यक्ष), अॅड. गजानन खैरकर (उपाध्यक्ष), अॅड. खुशाल शेंडे, अॅड. अजय कोटेवार, अॅड. मनवर, अॅड. किनाके, अॅड. बिजेवार, अॅड. भगत, अॅड. पाटील, अॅड. नाईनवार, अॅड. कटकमवार, अॅड. कोठेकर, अॅड. मेश्राम, अॅड. गौरकार, अॅड. रामटेके, अॅड. पवार, अॅड. चौधरी, अॅड. कटकोजवार, अॅड. लोढा, अॅड. देठे तसेच वकील संघाचे इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पाटणबोरीत पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पांढरकवडा पोलिसांची धाड; ८ जण ताब्यात, ₹१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मोहदा–झोटिंगधरा मार्गावर भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, पांढरकवड्यातील दोघे गंभीर जखमी

सायखेडा मध्यम प्रकल्प ९४.४०% भरला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, प्रशासनाचे खबरदारी घेण्याचे आवाहन

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला वणीतून जोरदार पाठिंबा; राष्ट्रपतींना एसडीओंमार्फत निवेदन, सोनम वांगचुक यांच्या ताब्याचा निषेध

साखरा उड्डाणपुलावर भीषण अपघात : रॉंग साईडने वळवलेल्या टाटा 407 ला ट्रकची समोरासमोर धडक; चालकाचा जागीच मृत्यू, मुलगा किरकोळ जखमी

पेपरफुटीविरोधात पांढरकवड्यात युवा टायगर फोर्सचा एल्गार; शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी एसडीओ कार्यालयावर भव्य मोर्चा

Leave a Comment