ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अब्दुल रहीम अब्दुल सईद यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

On: September 18, 2026 4:01 PM
Follow Us:
---Advertisement---

पांढरकवडा शहरातील टायर व्यवसायिक ‘रहीम भाई’ यांच्या निधनाने परिसरात शोककळा

✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा शहरातील मोमीनाबाद कॉलनीला लागून असलेल्या आशियाना ले-आऊट येथील रहिवासी तथा टायर व्यवसायिक अब्दुल रहीम अब्दुल सईद (वय 60 वर्षे) यांचे शुक्रवारी, दि. 18 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या दरम्यान तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, व्यावसायिक सहकारी आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

अब्दुल रहीम हे शहरात सर्वपरिचित ‘रहीम भाई’ या नावाने ओळखले जात होते. पांढरकवडा शहरातील मस्जिद वॉर्ड परिसरात दुचाकी वाहनांच्या टायर पंक्चरचे ‘ए.आर.’ नामक दुकान ते चालवत होते. तसेच शहरातील वाय-पॉइंट परिसरात ‘साजिद टायर वर्क्स’ हे दुकानही त्यांच्या व्यवसायाशी संबंधित होते. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपले होते.

शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिकांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिचित व मित्रपरिवारातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले तसेच मोठा आप्तेष्ट परिवार आहे. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत शनिवार, दि. 19 सप्टेंबर रोजी नमाजे जोहर नंतर दुपारी 2 वाजता दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

अब्दुल रहीम यांच्या निधनाने पांढरकवडा शहरातील परिचितांमध्ये शोककळा पसरली असून, त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment