ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; ‘झेड प्लस’ सुरक्षेसाठी राष्ट्रपतींना निवेदन

On: September 21, 2026 2:06 AM
Follow Us:
---Advertisement---

हल्ल्याची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची भीम आर्मीची मागणी; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

✍️वणी: महेश टिपले


आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर करण्यात आले आहे. चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि समयबद्ध चौकशी करण्यात यावी, तसेच हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, चंद्रशेखर आझाद हे लोकप्रतिनिधी असून सामाजिक व संविधानिक मुद्द्यांवर सातत्याने भूमिका मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीच्या सुरक्षेपुरता मर्यादित नसून लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये, कायदा-सुव्यवस्था आणि लोकप्रतिनिधींच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय आहे.

🎯 हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

चंद्रशेखर आझाद यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून घटनेमागील नेमके कारण, हल्ल्यामागील व्यक्ती अथवा अन्य घटक तसेच या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबी जनतेसमोर आणाव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तपास कोणत्याही दबावाशिवाय आणि निष्पक्षपणे करण्यात यावा, तसेच दोषी आढळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका भीम आर्मीने मांडली आहे.

🎯 ‘झेड प्लस’ सुरक्षेची मागणी

दरम्यान, भाई चंद्रशेखर आझाद यांच्या जीवाला संभाव्य धोका लक्षात घेता त्यांच्या विद्यमान सुरक्षा व्यवस्थेचा तातडीने आढावा घेण्यात यावा आणि त्यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी प्रमुख मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान तसेच प्रवासाच्या वेळी आवश्यक ती अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, संभाव्य धोक्यांचे मूल्यांकन करून त्यानुसार सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणीही पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

🎯 महाराष्ट्रात आंदोलनाचा इशारा

निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने महाराष्ट्रात लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रशेखर आझाद यांच्या सुरक्षेचा मुद्दा आता संघटनात्मक पातळीवर अधिक तीव्रतेने मांडला जात असल्याचे दिसून येत आहे.

🎯 निवेदनावर भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तसेच उपजिल्हाध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यावेळी रवींद्रभाऊ मेश्राम, हरीशभाऊ पाते, अनूपभाऊ नगराळे, आदित्यभाऊ कुंभारे, गजानन भाऊ दामोदर, नरेंद्र भाऊ वाळके, सचिन भाऊ गरघाटे, प्रदीप भाऊ मडावी, निखिल भाऊ मडावी, बबलू भाऊ मडावी, महेश भाऊ टिपले, राज्जत भाऊ सातपुते, अनूप भाऊ लोहकरे आणि आकाश भाऊ बोरकर यांच्यासह भीम आर्मीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“जय भीम! | जय संविधान! | जय भारत!” असा नारा देत संविधानिक हक्क आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment