✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा पोलीसांनी पाटणबोरी येथील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण ₹१,१९,९८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जुलै २०२६ रोजी पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या गस्ती पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, ग्राम पाटणबोरी, वार्ड क्रमांक ३, मेन लाईनलगत असलेल्या सार्वजनिक मोकळ्या जागेत काही इसम पैशावर हारजीत लावून पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेल्या आठ जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.

🎯 ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
1. विलास महादेवराव राजुलवार (वय ६५, रा. वार्ड क्र. ३, पाटणबोरी)
2. शेख बशिर शेख फरीद (वय ६०, रा. वार्ड क्र. ३, पाटणबोरी)
3. गजानन बापुराव शिलतावार (वय ४९, रा. चनाखा, ता. केळापूर)
4. राहुल गंगाधर भोयर (वय ३५, रा. दाभा, ता. झरी-जामणी)
5. अमोल तुळशिराम सोयाम (वय ३१, रा. पाटणबोरी)
6. अजिज मोहम्मद काठोडे (वय ८४, रा. वार्ड क्र. ३, पाटणबोरी)
7. शंकर नारायण जगडमवार (वय ५२, रा. वार्ड क्र. ६, पाटणबोरी)
8. सुभाष महादेव राऊत (वय ५९, रा. अहेरअळी, ता. झरी-जामणी)

🎯 जप्त मुद्देमाल
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून:
🔺रोख रक्कम – ₹२०,१८०
🔺७ मोबाईल फोन – अंदाजे ₹४९,८००
🔺हिरो एचएफ डिलक्स दुचाकी (MH-29-VY-0065) – अंदाजे ₹५०,०००
असा एकूण ₹१,१९,९८० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहेत.
🎯 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
या कारवाईत सपोनि सागर पेंढारकर, पोलीस हवालदार रजनीकांत पाटील, पोलीस नाईक सुनील राठोड, पोलीस कॉन्स्टेबल विजय राठोड आणि राजू मुत्यलवार यांनी सक्रिय सहभाग घेतला.










