⛔आमदार संजय पाटील देरकर यांच्या हस्ते शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत; किरणताई देरकर यांनी दिला शिक्षणासाठी खंबीर साथ देण्याचा शब्द
✍️वणी : प्रतिनिधी
आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या उज्वला मेश्राम या मुलीच्या शिक्षणाला आधार देत आमदार संजय पाटील देरकर यांच्या कुटुंबाने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. आमदार संजय पाटील देरकर यांच्या पत्नी सौ. किरणताई संजय देरकर यांनी उज्वलाची परिस्थिती जाणून घेत तिच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द पाळत त्यांनी उज्वलाला आर्थिक व शैक्षणिक मदतीचा हात दिला.
हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त बाळापूर (बोपापूर) येथे किरणताई देरकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, उज्वला मेश्राम हिच्या आई-वडिलांचे छत्र नाही. ही बाब समजताच किरणताईंनी उज्वलाला आपुलकीने जवळ घेत तिची प्रेमाने विचारपूस केली आणि तिच्या परिस्थितीची माहिती जाणून घेतली. उज्वलाची परिस्थिती समजल्यानंतर ताई भावूक झाल्या.
यावेळी त्यांनी उज्वलाला “तुझ्या शिक्षणासाठी मी नक्की मदत करेन आणि तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन,” असा शब्द दिला.
विशेष म्हणजे, कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांनी हा शब्द विसरला नाही. त्यांनी गावातील गौरवभाऊ पंधरे यांच्याशी संपर्क साधून उज्वला मेश्राम हिच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली. माहिती मिळाल्यानंतर किरणताई देरकर यांनी उज्वलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचा पुढाकार घेतला.

आज मा. आमदार श्री. संजय पाटील देरकर यांच्या हस्ते उज्वलाला शैक्षणिक खर्चासाठी रोख आर्थिक मदत देण्यात आली. या मदतीमुळे उज्वलाला तिचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी मोठा आधार मिळाला असून, तिच्या मनातही नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.
यावेळी किरणताईंनी उज्वलाला प्रोत्साहन देताना, “तुझ्यावर कोणतेही संकट आले तरी आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तू मन लावून शिक्षण घे, आयुष्यात मोठी हो, समाजात स्वतःचे नाव कमव आणि एक दिवस मोठी अधिकारी बन,” असा विश्वास दिला.
एखाद्या कार्यक्रमात भेटलेल्या मुलीची परिस्थिती जाणून घेणे, तिला आधार देण्याचा शब्द देणे आणि त्यानंतर दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे, ही सामाजिक संवेदनशीलतेची आणि माणुसकीची प्रेरणादायी बाब आहे.
सौ. किरणताई संजय देरकर यांच्या या संवेदनशीलतेला, सामाजिक बांधिलकीला आणि मायेच्या आधाराला मनापासून सलाम!
उज्वला मेश्राम हिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!








