ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक-शिक्षक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

On: August 9, 2026 1:15 PM
Follow Us:
---Advertisement---

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाच्या समन्वयावर भर

✍️वणी :  प्रतिनीधी


येथील लायन्स इंग्लिश मीडियम स्कूल, देशमुखवाडी व रवीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सरी ते इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पालक-शिक्षक सभेचे आयोजन दि. ७ व ८ ऑगस्ट २०२६ रोजी देशमुखवाडी येथील शाळेच्या सभागृहात करण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या अडचणी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध विषयांवर पालकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. या सभेला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व विद्येची देवी सरस्वती यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, माजी आमदार तथा शाळेचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार होते. प्रमुख अतिथी म्हणून लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट तथा शाळेचे उपाध्यक्ष बलदेव खुंगर, अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे, पर्यवेक्षिका सौ. सुनीता खुसपुरे उपस्थित होते. तसेच पालक प्रतिनिधी सौ. नेहा कडू, सौ. रागिणी नंदीग्रामवार, श्री. सुहास कुसराम व सौ. सरिता कोंडावार यांची उपस्थिती होती.

पालक-शिक्षक सभेदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळेतील विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच त्यांच्या शैक्षणिक विकासाशी संबंधित विविध प्रश्न, सूचना व अपेक्षा पालकांनी मनोगतातून मांडल्या. पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वतः उत्तरे देत त्यांच्या समस्या व सूचनांची गांभीर्याने दखल घेतली.

यावेळी बोलताना संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले की, पालकांनी मांडलेल्या सूचना व अपेक्षा रास्त असून त्या शाळेच्या शैक्षणिक वाटचालीसाठी निश्चितच मार्गदर्शक आहेत. वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार ज्ञान पोहोचविणे हे लायन्स शाळेचे ध्येय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तमोत्तम शिक्षण मिळावे यासाठी शाळा सातत्याने प्रयत्नशील राहील. पालकांच्या समस्या व अडचणींचे योग्य निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अकॅडेमीक डायरेक्टर प्रशांत गोडे यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेबरोबरच पालकांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना घरी अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून द्यावे, त्यांच्यामध्ये नियमित अभ्यासाची सवय निर्माण करावी तसेच त्यांच्या दैनंदिन शैक्षणिक प्रगतीकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पालक प्रतिनिधी सौ. नेहा कडू, सौ. रागिणी नंदीग्रामवार, श्री. सुहास कुसराम व सौ. सरिता कोंडावार यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील समन्वय व परस्पर सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी शिक्षिका रंजू झाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका सौ. सुनीता खुसपुरे यांनी केले. सूत्रसंचालन गुलनाज शेख व सौ. भारती वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मृणाल चौधरी व सौ. शुभांगी बरडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

पालक-शिक्षक सभेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिपाई कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment