ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणीकरांसाठी चविष्ट मेजवानी; ‘रीध फूड प्लाझा’चा दिमाखात शुभारंभ

On: September 1, 2026 2:03 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔एकाच छताखाली विविध चविष्ट पदार्थांची रेलचेल; सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ग्राहकांना सेवा

✍️वणी : महेश टिपले


वणी शहरातील खवय्यांसाठी आता विविध चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद एकाच ठिकाणी घेण्याची संधी तेही ग्राहकांना परवडेल अशा वाजवी दरात उपलब्ध झाली आहे. शहरातील गगशेट्टीवार मंगल कार्यालय, मॅक्रून सीबीएसई स्कूलसमोर, वरोरा रोड, वणी येथे श्री. नानाभाऊ कापसे यांच्या माध्यमातून ‘रीध फूड प्लाझा’चा शुभारंभ ३ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात आला आहे.

वणी शहरात प्रथमच विविध प्रकारचे ज्यूस, नाश्त्याचे पदार्थ आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत ग्राहकांना विविध चवींचा आस्वाद घेता येणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘रीध फूड प्लाझा’ ग्राहकांच्या सेवेत राहणार आहे.

🎯 आरोग्यदायी ज्यूसपासून दिवसाची सुरुवात

सकाळच्या वेळेत ग्राहकांसाठी विविध प्रकारचे ताजे आणि आरोग्यदायी ज्यूस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये गुड मॉर्निंग ज्यूस, लौकी ज्यूस, ग्रीन ज्यूस, कारले ज्यूस, बीट ज्यूस, पुदिना ज्यूस, लिंबू ज्यूस तसेच विशेष सोलकढी यांचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेत चविष्ट पेयांचा आनंद घेण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.

🎯 पराठ्यांच्या विविध प्रकारांसह नाश्त्याची मेजवानी

नाश्त्यामध्येही ग्राहकांसाठी मोठी विविधता ठेवण्यात आली आहे. आलू पराठा, लौकी पराठा, पालक पराठा, बीट पराठा यांसह अनेक पदार्थ दिवसभर उपलब्ध राहणार आहेत.

याशिवाय वडापाव, मिसळ पाव, बगारा चावल, दाल सँडविच, ब्रेड पकोडा, समोसा, आलू बोंडा, भजे मिसळ अशा लोकप्रिय पदार्थांचाही आस्वाद ग्राहकांना घेता येणार आहे.

🎯 झणझणीत कोल्हापुरी मिसळ ठरणार खास आकर्षण

‘रीध फूड प्लाझा’चे आणखी एक खास आकर्षण म्हणजे झणझणीत कोल्हापुरी मिसळ पाव. अस्सल चवीच्या मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी वणीकरांनी एकदा तरी ‘रीध फूड प्लाझा’ला भेट द्यावी, असे आवाहन श्री. नानाभाऊ कापसे यांनी केले आहे.

“वणी शहरातील नागरिकांना विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्राहकांनी एकदा अवश्य भेट देऊन विविध पदार्थांचा आस्वाद घ्यावा,” असे आवाहन नानाभाऊ कापसे यांनी केले.

वणी शहरातील खवय्यांसाठी नव्या खाद्यस्थळाची भर पडल्याने ‘रीध फूड प्लाझा’ आगामी काळात ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment