⛔ २०२६–२७ ची नूतन कार्यकारिणी जाहीर; भव्य रॅलीसह त्रिदिवसीय जन्माष्टमी महोत्सवाचे नियोजन — महिला समितीतर्फे नृत्य स्पर्धेचेही आयोजन
✍️वणी : प्रतिनिधी
वणी शहरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला नवी उंची देणाऱ्या ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती’च्या अध्यक्षपदी ॲड. कुणाल विजय चोरडिया यांची वर्ष २०२६–२७ साठी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी निवर्तमान अध्यक्ष ॲड. कुणालबाबू चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांच्या अनुमतीने सभेच्या सर्वानुमते वर्ष २०२६–२७ ची नूतन कार्यकारिणी तसेच वरिष्ठ सल्लागार समिती जाहीर करण्यात आली. आगामी जन्माष्टमी महोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
🎯 नूतन कार्यकारिणी जाहीर
जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समितीच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी ॲड. श्री. कुणाल विजय चोरडिया, तर उपाध्यक्षपदी श्री. शुभमजी मदान व श्री. श्याम लाहारिया यांची निवड करण्यात आली.
कार्याध्यक्षपदी राहुलभाऊ मुंजेकर, सहकार्याध्यक्षपदी अभय नागतुरे, सचिवपदी उमेशबाबू पोद्दार, सहसचिवपदी सुधीरभाऊ तालसे, कोषाध्यक्षपदी जयंत पांडे आणि सहकोषाध्यक्षपदी राजू रिंगोले यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तसेच संयोजक म्हणून अमोल धानोरकर, प्रसिद्धी प्रमुख म्हणून आशिषजी सिसोदिया (जैन), सहप्रसिद्धी प्रमुख म्हणून दीपकजी पाऊणकर, सोशल मीडिया प्रमुख म्हणून पार्थजी त्रिवेदी आणि प्रिंट मीडिया प्रमुख म्हणून सौरभ राजुरकर यांची निवड करण्यात आली.

🎯 वरिष्ठ सल्लागारांचीही निवड
समितीच्या कामकाजाला मार्गदर्शन व अनुभवी नेतृत्व मिळावे यासाठी वरिष्ठ सल्लागार समितीचीही घोषणा करण्यात आली. या समितीत विजयजी चोरडिया, आशिषजी गुप्ता, निकेतजी गुप्ता, विजयजी पुण्यानी, दिवानजी फेरवानी, मूलचंदजी जोशी, राजाभाऊ बिलोरिया, महावीरजी कटारिया, नारायणभाऊ गोडे, सुरेशजी मांडवकर, संतोषजी मार्कंडे, अनिलजी रेभे, विशालभाऊ दूधबडे, गजाननजी बत्तुलवार, पिंकीजी बत्रा, प्रा. दिलीपजी अलोणे आणि मयूरजी गेडाम यांचा समावेश करण्यात आला आहे.
🎯 त्रिदिवसीय जन्माष्टमी महोत्सवाची जय्यत तयारी
बैठकीत आगामी त्रिदिवसीय श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सांस्कृतिक उपक्रम, आकर्षक सजावट, भव्य रॅली आणि नागरिकांना सहभागी करून घेणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध उपसमित्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळावा आणि जन्माष्टमी उत्सवाची परंपरा अधिक व्यापक स्वरूपात पुढे न्यावी, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
🎯 महिला समितीची भव्य नृत्य स्पर्धा ठरणार आकर्षण
जन्माष्टमी महोत्सवातील दरवर्षीचे प्रमुख आकर्षण असलेली भव्य नृत्य स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला समिती’च्या वतीने ही नृत्य स्पर्धा भव्य स्वरूपात घेण्यात येणार असून, महिला व युवतींना आपल्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
धार्मिक उत्सवाला सांस्कृतिक रंग देणाऱ्या या नृत्य स्पर्धेसह यंदाच्या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याने वणीकरांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. विशाल दूधबडे यांनी केले. बैठकीस समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा जन्माष्टमी महोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.









