⛔हँडलूम, हँडीक्राफ्टसह विविध राज्यांतील आकर्षक वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री; ७ सप्टेंबरपर्यंत आयोजन
✍️वणी : प्रतिनीधी
शहरातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या घरगुती, पारंपरिक तसेच आकर्षक वस्तूंची खरेदी करण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. ‘मंडळ/मंडी ओपन मार्ट’च्या माध्यमातून वणी शहरात भव्य शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून, या फेस्टिव्हलमध्ये तब्बल ३० हजार विविध प्रकारच्या घरगुती उपयोगी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये हँडलूम, हँडीक्राफ्ट आणि विविध राज्यांमधील प्रसिद्ध घरगुती व पारंपरिक वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. विशेष म्हणजे थेट विक्रेत्यांकडून खरेदी करण्याची संधी असल्याने नागरिकांना विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी पाहता व खरेदी करता येणार आहेत.

फेस्टिव्हलमध्ये मेरठची प्रसिद्ध खादी शर्ट, कुर्ती, पायजामा व खादी कुर्ती, लखनौची चिकन वर्क कुर्ती व सूट, जयपुरी ड्रेस, स्कर्ट व टॉप, भदोईचे कार्पेट व डोअरमॅट, खुर्जा येथील प्रसिद्ध क्रोकरी आयटम, आर्टिफिशियल ज्वेलरी, राजस्थानी मोजडी, चप्पल, बनारसी साडी, लेडीज ड्रेस मटेरियल, हँडलूम, सोफा कव्हर, लेदर वस्तू अशा विविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश आहे.
याशिवाय लेडीज फॅन्सी टॉप व कुर्ती, गालिचा, राजस्थानी चूर्ण-मुखवास व चूर्ण सुपारी, आचार, कलकत्ता जूट बॅग, सहारनपूरचे प्रसिद्ध वुडन फर्निचर, पाणिपतचे सोफा कव्हर व बेडशीट, सॉक्स, जीन्स, टी-शर्ट, किचनवेअर आदी वस्तूही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळणी (Toys) तसेच मुंबई व गुजरातमधील प्रसिद्ध नमकीन, खादी कुर्ती-पँट आणि खादी फ्रॉक प्लाझो यांचाही समावेश आहे.
विविध राज्यांतील उत्पादनांना एकाच ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याची संधी या उपक्रमातून मिळत आहे. त्यामुळे वणीकरांसाठी हा शॉपिंग फेस्टिव्हल खरेदीची विशेष पर्वणी ठरण्याची शक्यता आहे.

🎯 ७ सप्टेंबरपर्यंत फेस्टिव्हलचा लाभ घेता येणार
या शॉपिंग फेस्टिव्हलचा अंतिम दिवस ७ सप्टेंबर २०२६ असून, नागरिकांनी फेस्टिव्हलला भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
फेस्टिव्हलचे ठिकाण :
ओपन ग्राउंड, शिवसेना जनसंपर्क कार्यालयाजवळ, एल.टी. कॉलेजसमोर, वरोरा रोड, वणी.
घरगुती गरजेच्या वस्तूंपासून पारंपरिक हस्तकला, फॅशन, खाद्यपदार्थ, फर्निचर आणि मुलांच्या खेळण्यांपर्यंत विविध वस्तूंची मोठी श्रेणी उपलब्ध असल्याने वणी शहरासह परिसरातील नागरिकांसाठी हा फेस्टिव्हल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.









