ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

गणेशोत्सव हे सामाजिक एकतेचे प्रतीक — ॲड. कुणाल चोरडिया

On: October 3, 2026 3:16 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ सर्वोदय चौकातील साई गणेश मंडळातर्फे हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपती उत्सव उत्साहात; महाआरतीतून सामाजिक ऐक्याचा संदेश

✍️वणी : महेश टिपले


सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारे प्रभावी माध्यम ठरत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रम राबवून समाजातील ऐक्य अधिक मजबूत करता येते, असे प्रतिपादन ॲड. कुणाल चोरडिया यांनी केले.

वणी शहरातील सर्वोदय चौक येथे साई गणेश मंडळाच्या वतीने हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपती उत्सवानिमित्त आयोजित महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते. गणरायाला नुकताच निरोप दिल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ साजरा करण्यात येणाऱ्या या पारंपरिक हाडपक्या गणपती उत्सवाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी ॲड. चोरडिया यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सामाजिक महत्त्वावर प्रकाश टाकला. “गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येतात. परस्परांमध्ये बंधुभाव वाढतो आणि सामाजिक ऐक्याला बळ मिळते. धार्मिक उत्सवांना सामाजिक उपक्रमांची जोड दिल्यास त्याचा समाजाला मोठा फायदा होऊ शकतो,” असे त्यांनी नमूद केले.

🎯 हाडपक्या गणपतीच्या परंपरेचा इतिहास उलगडला

कार्यक्रमादरम्यान सुनील इंदुवामन ठाकरे यांनी हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपती उत्सवाची परंपरा व त्यामागील इतिहास उपस्थितांना सांगितला. या पारंपरिक उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व आणि गणेशोत्सवाशी असलेले नाते त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही प्रसंगानुरूप मनोगते व्यक्त करून सामाजिक एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

कार्यक्रमाला पत्रकार राजू धावंजेवार, परशुराम पोटे, डॉ. खापणे, सुनील इंदुवामन ठाकरे, जवाहर अरोरा यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कर्णेवार यांनी केले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी साई गणेश मंडळाचे दिनेश दुर्गे, सफल आनंदवार, सुजल मांढरे, गणेश पारशिवे, राहुल आनंदवार, राहुल दांडेकर, तुषार भांडेकर, प्रवीण दुर्गे, पवन दुर्गे, रवी नान्ने, ईश्वर पारशिवे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

महाआरती, धार्मिक वातावरण आणि सामाजिक ऐक्याचा संदेश यामुळे सर्वोदय चौकातील हाडपक्या गणपती उत्सवाला विशेष रंगत आली. परंपरेचे जतन करत सामाजिक सलोखा जोपासण्याचा संदेश देणारा हा उत्सव नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment