ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

गांधीजींचे विचार आजही जगाला मार्गदर्शक; अहिंसेचा संदेश आत्मसात करण्याचे आवाहन

On: October 5, 2026 11:54 AM
Follow Us:
---Advertisement---

⛔महात्मा गांधी व शास्त्रीजी जयंतीनिमित्त वणीत अभिवादन; जागतिक अहिंसा दिन उत्साहात साजरा

✍️वणी : महेश टिपले


महात्मा गांधी हे केवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेते नव्हते, तर संपूर्ण विश्वासाठी प्रेरणास्थान ठरलेले महान विचारवंत होते. सत्य, अहिंसा, शांतता आणि मानवतेच्या मूल्यांवर आधारित त्यांचे विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांनी दिलेले योगदान अतुलनीय असून, मानवाच्या उद्धारासाठी त्यांनी केलेले कार्य जगासाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच जागतिक अहिंसा दिनानिमित्त वणी शहरातील गांधी चौक व शास्त्रीनगर येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना संजय खाडे बोलत होते.

यावेळी बोलताना संजय खाडे म्हणाले की, महात्मा गांधींची जयंती केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून साजरी केली जाते. गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांनी जगभरातील अनेक नेत्यांना व सामाजिक चळवळींना प्रेरणा दिली आहे. संघर्षाच्या मार्गावर हिंसेऐवजी सत्य, संयम आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारल्यास समाजात शांतता व बंधुभाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गांधीजींचे विचार केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेच्या विचारांचेही यावेळी स्मरण करण्यात आले. देशाच्या कठीण काळात शास्त्रीजींनी दाखविलेल्या नेतृत्वाची आणि ‘जय जवान, जय किसान’ या संदेशाची आजही समाजाला प्रेरणा मिळते, असे उपस्थितांनी नमूद केले.

कार्यक्रमाला अनंतलाल चौधरी, जय आबड, विकेश पानघाटे, वंदना आवारी, शामा तोटावार, मोवाडे, अशोक पांडे, प्रमोद लोणारे, अनिल ठाकूरवार, पांडुरंग बत्तुलवार, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, राजू अंकतवार, नीलिमा काळे, पांडुरंग पंडिले, संदीप बोथरा, सुनील इंदुवामन ठाकरे, सुनील वरारकर, शरद मंथनवार, वंदना धगडी, सविता रासेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment