⛔जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी १२ खेळाडूंची निवड; विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींचीही दमदार कामगिरी
✍️वणी/ महेश टिपले
तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सुशगंगा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी १२ विद्यार्थ्यांची निवड मिळवली. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.
विद्यार्थी : रिजवान हैदरी, जनक कुच्चेवार, सुजात अली, अरमान शेख, सोहम ताजने, रोहन नानवाणी आणि यश शंकदरवार यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.

विद्यार्थिनी : ईशा सुरपाम, आराध्या वाटेकर, आर्या पिसे, विराली भगत आणि आराध्या गटलेवार यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरावर आपले स्थान पक्के केले.
या यशाबद्दल सुशगंगा पब्लिक स्कूलच्या शिक्षकवृंद, पालक आणि क्रीडाप्रेमींनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर जिल्हास्तरीय स्पर्धेतही हे खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.










