✍️मारेगाव: अशफाक खान
मारेगाव-वणी राज्य महामार्गावर तुळशीराम बारसमोर आज शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने मारेगाव तालुक्यात तसेच परिसरात प्रचंड शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये गौरव बापूराव आत्राम (23 वर्षे), रा. गौराळा आणि नमेश्वरी राजेंद्र हनुमंते (17 वर्षे), रा. बोपापूर (कायर), ह. मु. मारेगाव यांचा समावेश आहे.
🎯अपघाताची थरकाप उडवणारी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही स्कूटीने वणीवरून मारेगावच्या दिशेने येत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव आयसर ट्रकची स्कूटीला समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की स्कूटी थेट ट्रकच्या चाकांमध्ये अडकली आणि ट्रकने तिला काही मीटरपर्यंत ओढत नेले.
धडकेमध्ये स्कूटीचे पूर्णतः चेंगराचेंगरीसारखे स्वरूप झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची पुष्टी स्थानिकांनी दिली.
🎯ट्रक चालकाची तत्परता; पोलिसांचे तत्काळ पथक घटनास्थळी
अपघात घडताच ट्रक चालकाने तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून पोलिसांना माहिती दिली. खबर मिळताच मारेगाव पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलवले.
पुढील तपास मारेगाव पोलिसांच्यावतीने सुरू आहे.
🎯 विद्यार्थी समाजाला मोठा धक्का
मृत युवक गौरव आत्राम हा दहावी उत्तीर्ण होता, तर नमेश्वरी हनुमंते ही बारावीची विद्यार्थिनी असून मारेगावात शिक्षण घेत होती. दोघांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
🎯 पंचक्रोशीत पसरलेली शोककळा
या हृदयद्रावक अपघातामुळे मारेगाव आणि परिसरातील नागरिकांत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. दोघांच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
तरुण वयात दोन जिवांचे असे अचानक मृत्यु झाल्याने संपूर्ण तालुक्यात दुःखाची लाट उमटली आहे.











