ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

६२ व्या वर्षीही खेळाडू वृत्तीचा दमदार आविष्कार!  पांढरकवडा येथील ऍड. के.जी. मुत्यालवार यांना ‘सामनावीर’ पुरस्कार

On: February 21, 2026 7:08 AM
Follow Us:
---Advertisement---


✍️मारेगाव :  अशफाक खान

मारेगाव वकील संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरतालुका वकील क्रिकेट स्पर्धेत क्रीडाप्रेमींना थरारक सामने अनुभवायला मिळाले. या स्पर्धेत पांढरकवडा वकील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत आपली ताकद सिद्ध केली. विशेष म्हणजे ६२ वर्षीय ज्येष्ठ वकील ऍड. के.जी. मुत्यालवार यांनी शानदार गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेतील उपांत्य सामना राळेगाव वकील संघ विरुद्ध पांढरकवडा वकील संघ यांच्यात रंगला. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात पांढरकवडा संघ अडचणीत असताना संघाचे कर्णधार ऍड. के.जी. मुत्यालवार यांनी गोलंदाजीची धुरा सांभाळली. आपल्या अनुभव आणि अचूक टप्प्याच्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी एका षटकात सलग ३ गडी बाद करत सामन्याला कलाटणी दिली. त्यांच्या या भेदक गोलंदाजीमुळे राळेगाव संघाचा डाव कोलमडला आणि पांढरकवडा संघाने निर्णायक विजय संपादन केला. ऍड. मुत्यालवार यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले. सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश मा. श्री. के. पी. दवणे यांच्या हस्ते . मुत्यालवार यांना ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित वकील बांधव, न्यायालयीन कर्मचारी व क्रीडाप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
६२ व्या वर्षीही मैदानावर उतरून उत्कृष्ट गोलंदाजी करत सामनावीराचा किताब पटकावणे हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. वय केवळ एक संख्या असून जिद्द, सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते, याचे जिवंत उदाहरण ऍड. के.जी. मुत्यालवार यांनी दाखवून दिले.
या यशाबद्दल पांढरकवडा वकील संघातील सहकाऱ्यांनी तसेच विविध तालुक्यातील वकील संघटनांनी ऍड. मुत्यालवार यांचे अभिनंदन करून पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. स्पर्धेमुळे वकील बांधवांमध्ये एकात्मता व क्रीडाभावना अधिक दृढ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

वीज समस्यांवर थेट तोडगा; मारेगावात आज ‘जनता दरबार’आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत महावितरण कार्यालयात विशेष उपक्रम; शेतकरी व नागरिकांना तक्रारी मांडण्याचे आवाहन

उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा हात दंडापासून अलग

केगावच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित एसटी बससेवा सुरू करा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन

सगणापूरमध्ये भीषण आग; शॉर्टसर्किटचा संशय, गरीब शेतमजुराचे घर व संपूर्ण संसार जळून खाक

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

लग्नाच्या महिनाभरातच नवदाम्पत्याची हृदयद्रावक आत्महत्या; पोटाला दगड बांधून विहिरीत उडी, सग्नापूर शोकसागरात

Leave a Comment