ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

कर्तव्यावर परतताना देशाने गमावला एक वीर जवान, केळापूर तालुक्यातील CRPF जवान विनोद पुसनाके यांचे अपघाती निधन

On: February 6, 2026 2:47 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️पांढरकवडा : अशफाक खान

केळापूर तालुक्यातील बोथ (ता. केळापूर, जि. यवतमाळ) येथील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मधील कर्तव्यनिष्ठ जवान विनोद पुसनाके यांचे कर्तव्यावर परतत असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. ही हृदयद्रावक घटना मध्य प्रदेश सीमेच्या परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्तव्यावर रुजू होत असताना झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बोथ गावासह संपूर्ण केळापूर तालुका आणि

🎯 परिसरात शोककळा पसरली आहे.
धाडस, शिस्त आणि देशसेवेचे प्रतीक
विनोद पुसनाके हे अत्यंत धाडसी, शिस्तप्रिय आणि देशसेवेसाठी पूर्णतः समर्पित जवान म्हणून परिचित होते. CRPF मध्ये सेवा बजावताना त्यांनी अनेक आव्हानात्मक आणि कठीण परिस्थितींना धैर्याने सामोरे जात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. सहकारी जवानांमध्ये ते कर्तव्यनिष्ठा, संयम आणि जबाबदारीसाठी आदराने ओळखले जात होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी जवान आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. गावात शोकमय वातावरण असून प्रत्येकजण या वीर जवानाच्या आठवणींनी भावूक झाला आहे.

🎯 शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार
शहीद जवान विनोद पुसनाके यांच्या पार्थिवावर शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या मूळ गावी बोथ, ता. केळापूर, जि. यवतमाळ येथे शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी CRPF बटालियनकडून शस्त्र सलामी देण्यात येणार असून, प्रशासकीय अधिकारी, CRPF चे वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

🎯 भावपूर्ण श्रद्धांजली
ग्रामस्थ, विविध सामाजिक संस्था आणि मान्यवरांकडून या वीर जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. देशसेवेतील त्यांचे योगदान कधीही विसरले जाणार नाही, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत.
देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वीर सुपुत्राला विनम्र अभिवादन.

विनोदजी पुसनाके अमर रहें. यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार, सहकारी जवान आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. गावात शोकमय वातावरण असून प्रत्येकजण या वीर जवानाच्या आठवणींनी भावूक झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

लग्नाच्या उंबरठ्यावर दुर्दैवाचा घाला; घोटी येथे अपघातात १५ वर्षीय पुतण्याचा मृत्यू, दोघे जखमी

100 कोटी ठेवींचा टप्पा पार; गोदावरी अर्बन वणी शाखेची दमदार कामगिरी, व्यवस्थापक विजय मोडक यांचा भव्य सन्मान

बुद्ध पौर्णिमा विशेष : पाथरी येथे एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन; जुन्या साधकांसाठी सुवर्णसंधी

पाटणबोरीत गोवंशीय जनावरांची मोठी सुटका; दोन दिवसांत दोन कारवाया, ९ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

करंजीत ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची मोठी कारवाई; ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ₹९६ हजारांचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा शहरातील वाहतूक प्रश्न बनला बिकट , वाहतूक ठप्प — शिबला रोडवर सर्वाधिक कोंडी; प्रशासनाचे दुर्लक्ष

Leave a Comment