✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या दिशेने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. दि. 21 नोव्हेंबर ही नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर नगराध्यक्ष तसेच सदस्य पदांच्या स्पर्धेचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. दिवसभर निवडणूक कार्यालयात उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्यांची लगबग, सल्लामसलत, बैठका पाहायला मिळाल्या.
🎯 नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवारांचे रिंगण — 4 जणांची माघार
नगराध्यक्ष पदासाठी एकूण 11 उमेदवारांचे नामांकन वैध ठरले होते. मात्र अंतिम दिवशी 4 अपक्ष उमेदवारांनी आपली नामांके मागे घेतली. त्यामुळे आता एकूण 7 उमेदवार स्पर्धेत कायम राहिले असून थेट लोकांमधून निवडल्या जाणाऱ्या या पदासाठी जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.
माघार घेतलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची नावे
🔺1. उप्पलवार स्वप्नील विलासराव
🔺2. कायपेल्लीवार प्रकाश इस्तारी
🔺3. जुवारे गजानन ऋषीजी
🔺4. नैताम अंकुश उर्फ अंकित बबनराव
उरलेले 7 उमेदवार (नगराध्यक्ष पद – पांढरकवडा 2025)
1. कनाके किशोर दादाराव
2. तवर नौशाद नुरुद्दीन
3. तिवारी विनोदकुमार जमुनाशंकर
4. नहाते अभिनय रामचंद्र
5. बडे शंकर मनोहरपंत
6. बोरेले आतिश लक्ष्मण
7. म्यानेवार मोहन पोषट्टी
या सात उमेदवारांमधील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. सर्वच उमेदवारांनी या टप्प्यानंतर प्रचारयुद्धाला वेग देण्यास सुरुवात केली आहे. घराघरांतील भेटी, सोशल मीडिया मोहिमा, तरुणांना आकर्षित करणाऱ्या सभा, रस्त्यावरची प्रचार रॅली यांना आता अधिक वेग येणार आहे.
🎯 सदस्य पदासाठीही माघारीची लगबग — 100 पैकी 8 उमेदवार बाहेर
11 प्रभागांमधील 22 सदस्य पदांसाठी एकूण 100 नामांकन पत्रे वैध ठरली होती. मात्र आज 8 अपक्ष उमेदवारांनी आपली नामांके मागे घेतली. आणि 8 नामांकन दोन प्रतीत असल्यामुळे आता एकूण 84 उमेदवार सदस्य पदासाठी स्पर्धेत आहेत.
आज नामांकन मागे घेणारे सदस्य पदाचे उमेदवार (अपक्ष)
क्रमांक प्रभाग उमेदवाराचे नाव पक्ष
1. 1 ब विशाल नारायण सिडाम अपक्ष
2. 4 ब से. अफरोज सै. फिरोज अपक्ष
3. 5 ब सौ. उप्पलवार राणी स्वप्नील अपक्ष
4. 6 अ संतोष नारायण पवार अपक्ष
5. 7 अ सोनाली कमोल गोपतवार अपक्ष
6. 8 ब प्रकाश पोषट्टी मिंचेवार अपक्ष
7. 9 अ संतोष बबनराव नैताम अपक्ष
8. 11 ब शेख युनुस महेबूब अपक्ष
माघारीनंतर काही प्रभागात लढती त्रिकोणी, तर काही ठिकाणी थेट समोरासमोर होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
🎯 राजकीय समीकरणांवर ‘माघारी’चा परिणाम
नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात बहुतांश माघारी अपक्षांकडून झाल्याने प्रमुख पक्षांच्या आघाड्यावरील परिणाम मर्यादित दिसत आहे.
राजकीय पटलावर
युवा मतदारांचा ओढा कोणाकडे?
स्थानिक मुद्दे — पाणी, नितांत गरजेची नागरी कामे, कचरा व्यवस्थापन, विकास निधी यांवर कोणती बाजू भक्कम?
या प्रश्नांवरच अंतिम निकाल ठरणार असल्याच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत.
🎯 आगामी निवडणूक टप्पे (महत्त्वाच्या तारखा)
अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप : 26 नोव्हेंबर 2025
मतदान : 2 डिसेंबर 2025
मतमोजणी : 3 डिसेंबर 2025
नगराध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जाणार असल्याने पांढरकवड्यातील वातावरण तापले आहे. पुढील 10 दिवसांत प्रचाराचा कळस गाठला जाणार असून शहरातील राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🎯 मतदारांचे वातावरण — उत्सुकता शिगेला
मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
रात्री उशिरापर्यंत राजकीय चर्चांना रंग चढले आहेत.
तरुण वर्गातही निवडणुकीबद्दल वेगळे औत्सुक्य आहे.
पक्षीय, अपक्ष सर्वच उमेदवारांनी मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जोरदार डावपेच आखायला सुरुवात केली आहे.
पांढरकवड्यातील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, अंतिम निकाल 3 डिसेंबरला स्पष्ट होणार असला तरी यापूर्वीच कोण बाजी मारणार, याबाबत शहरात अंदाजांची मालिका सुरु झाली आहे.









