✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवड्यातील आठवडी बाजार परिसरातील सर्वपरिचित जैन जनरल स्टोअर्स चे मालक नरेश उर्फ छोटा मुन्ना प्रेमचंद लोढा (वय 55) यांचे आज शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने व्यापारी वर्गासह शहरातील नागरिकांत शोककळा पसरली आहे.
नरेश लोढा हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. अत्यंत सौम्य स्वभाव, मनमिळावू वृत्ती आणि प्रामाणिक व्यावसायिक प्रतिमा यामुळे ते शहरात सर्वांना परिचित होते. त्यांच्या दुकानामुळे अनेक वर्षे परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत आल्या. त्यांच्या निधनाने पांढरकवडा शहराने एक सेवाभावी आणि आदरणीय व्यापारी गमावला आहे.
🎯 अंत्यविधीची माहिती
त्यांचा अंतिम स्ववकार उद्या शनिवार, दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथील मोक्षधाम येथे करण्यात येईल.
त्यांची अंतिम यात्रा त्यांच्या शास्त्रीनगर, हत्ती गार्डनजवळील राहत्या घरातून निघणार असून मोठ्या संख्येने नातलग, परिचित, व्यापारी बांधव आणि मित्र परिवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
🎯 कौटुंबिक माहिती
त्यांच्या पश्चात, पत्नी
🔺एक मुलगा – CA आनंद लोढा
🔺एक मुलगी – इन्टेरिअर डिझायनर अंशू लोढा
🔺मोठे भाऊ – महेश लोढा
🔺पुतण्या – ॲड. सिद्धार्थ लोढा
तसेच इतर आप्त–परिवार असा मोठा परिवार आहे.
शहरातील विविध सामाजिक आणि व्यापारी संघटनांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना व्यक्त केली आहे.









