⛔नगराध्यक्षपदाचे उमेदवार बॅरिस्टर विनोद तिवारी यांच्या नेतृत्वात एकजुटीचे महाप्रदर्शन
✍️पांढरकवडा : अशफाक खान
पांढरकवडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत आज काँग्रेस व विदर्भ जनआंदोलन समिती युतीने आपली ताकद दाखवत भव्य कार्यकर्ता संमेलन व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोहळा उत्साहात साजरा केला. नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार बॅरिस्टर विनोद तिवारी आणि नगरसेवक पदाचे २२ उमेदवार यांच्या प्रचार मोहिमेचा आज मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
🎯 छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवादनातून प्रचाराची सुरुवात
प्रचाराच्या शुभारंभापूर्वी सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास नतमस्तक होत अभिवादन केले. यानंतर शिस्तबद्ध आणि उत्साही शक्तीप्रदर्शन करत सर्वांनी एकत्रितपणे प्रचार कार्यालयाकडे मार्गक्रमण केले.

🎯 प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते
युतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन चंद्रपुर आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते झाले. त्यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला. उद्घाटनानंतर त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत निवडणुकीत संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले.
🎯 माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे मार्गदर्शन
कार्यकर्ता संमेलनादरम्यान माजी मंत्री व जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी आपले विचार मांडले. त्यांनी युतीचे उमेदवार शहराच्या विकासाला प्राधान्य देणारे असल्याचे सांगत नागरिकांनी परिवर्तन घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
🎯 प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आरीज बेग मिर्झा यांची उपस्थिती ठळक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. आरीज बेग मिर्झा यांच्या उपस्थितीने प्रचाराचा उत्साह अधिक वाढला. त्यांनी युतीच्या धोरणांचा आढावा देत विकासाभिमुख राजकारणासाठी काँग्रेसने नेहमीच काम केले असल्याचे सांगितले.
🎯 अनेक मान्यवरांची उपस्थिती – एकजुटीचे प्रदर्शन
या कार्यक्रमाला शहरातील आणि युतीमधील प्रमुख नेत्यांनी भेट देत कार्यक्रमाला अधिक भव्यता प्राप्त करून दिली. यामध्ये प्रमुख उपस्थिती :
🔺मा. खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर
🔺मा. शिवाजीराव मोघे (माजी मंत्री)
🔺मा. आरीज बेग मिर्झा (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी)
🔺माजी नगराध्यक्ष श्री. अनिल तिवारी
🔺माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे
🔺काँग्रेस शहराध्यक्ष मनोज भोयर
🔺शंकर सामृतवार, हफीज पोसवाल, शहबाज खान
युतीचे सर्व २२ नगरसेवक पदांचे उमेदवार
सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येतील कार्यकर्ते व नागरिक कार्यक्रमादरम्यान शहरातील विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, नागरिक सहभाग यांसारख्या विषयांवर युतीचे आगामी कार्य आराखडा जाहीर करण्यात आला.

🎯 कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहला
स्थानिक नागरिक, महिला कार्यकर्त्या, युवक, व्यापारी व समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युतीच्या उमेदवारांप्रती विश्वास व्यक्त केला. संपूर्ण परिसरात घोषणाबाजी, ढोल-ताशे आणि प्रचारगीतांनी वातावरण दणाणून गेले.
🎯 कार्यक्रमाचे ठिकाण
📍 विदर्भ जनआंदोलन समिती कार्यालय, शिवाजी महाराज पुतळ्या जवळ, पांढरकवडा
🧿 मंगळवार, २५ नोव्हेंबर
या प्रचार मोहिमेच्या भव्य शुभारंभामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस–विदर्भ जनआंदोलन समिती युतीने लढतीत आपला दमदार दावा प्रस्तुत केला आहे.









