– अवधूतवाडी पोलीस ठाण्यात १ लाखाची लाच स्वीकारताना सापळा यशस्वी; ५ लाखांची मागणी, ३ लाखांवर सौदा तय
✍️यवतमाळ : अशफाक खान
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), अमरावती यांनी आज केलेल्या धडक कारवाईत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर (वर्ग-१) यांना १,००,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. मागणी केलेली एकूण लाच ५,००,००० रुपये असून पडताळणी दरम्यान ३,००,००० रुपयांवर सौदा ठरल्याचे स्पष्ट झाले.
🎯 तक्रारीचा उगम : तक्रारदार मित्राला दिलेल्या 10 लाखांच्या रकमेसाठी मदत मागताच ‘लाचेची’ मागणी
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार :
🔺तक्रारदाराने आपल्या मित्राला आर्थिक मदत म्हणून १०,००,००० रुपये मध्यस्थी करून दिले होते.
🔺६ महिने उलटूनही ही रक्कम परत करण्यात आली नव्हती.
🔺त्यामुळे तक्रारदाराने १० डिसेंबर रोजी अवधूतवाडी पो.ठाण्यात तक्रार दिली.
🔺तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान पो.नि. नरेश रणधीर यांनी तक्रारदाराला त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ५ लाख रुपये लाचेची मागणी केली, असे तक्रारदाराने लेखी स्वरूपात ACB कडे दिले.
यानंतर ACB, अमरावतीने तात्काळ पडताळणीची प्रक्रिया सुरू केली.
🎯 पडताळणीदरम्यान लाचेची मागणी सिद्ध; कारवाईचा सापळा रचला
🔻12 डिसेंबर 2025 रोजी ACB पथकाने केलेल्या पडताळणीत :
🔻पोलीस निरीक्षक रणधीर यांनी ३ लाख रुपये लाचेची मागणी कायम ठेवलेली असल्याचे निष्पन्न झाले.
🔻त्यानंतर ACB ने रणनीती आखून सापळा लावला.
🎯 ACBचा सापळा यशस्वी — १ लाखांची लाच स्वीकारताना अटक
🔺तक्रारदाराने दिलेल्या संकेतावरून आज दुपारी 1.45 ते 2.21 या वेळेत अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या दालनात :
🔺पो.नि. रणधीर यांनी १,००,००० रुपये लाच प्रत्यक्ष स्वीकारले.
🔺स्वीकारताच ACB पथकाने त्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
त्यांच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
🎯 कारवाईत सहभागी पथक
ही यशस्वी कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली :
🔻श्री. बापू बांगर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
🔻श्री. सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक
🔻श्री. सुनिल किनगे, पोलीस उपअधीक्षक
🔻कारवाई करणारे अधिकारी व कर्मचारी :
🔻पो.नि. चित्रा मेसरे
🔻पो.नि. स्वप्निल निराळे
🔻पो.शि. शैलेश कडू
🔻उपेंद्र थोरात
🔻वैभव जायले
🔻चालक स.पो.उ.नि. सतीश किटूकले
🔻चालक पो.कॉ. राजेश बहिरट
🎯 ACB अमरावतीचे आवाहन : लाच मागितल्यास त्वरित संपर्क साधा
नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही सरकारी अधिकारी/कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास तात्काळ ACB शी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक :
🧿श्री. बापू बांगर, पोलीस अधीक्षक
मो. 9011323426
🧿श्री. सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक
मो. 9764210485
🧿श्री. सुनिल किनगे, पोलीस उपअधीक्षक
मो. 9823111155 / 7517571064
कार्यालयाचा पत्ता :
⛔अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती
ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, अमरावती
हेल्पलाइन :
टोल फ्री : 1064
दूरध्वनी : 0721-2553055











