ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

वणी लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, नांदेपेरा (इमारत) येथे क्रीडास्पर्धांचे थाटात उद्घाटन

On: December 27, 2025 5:00 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️वणी प्रतिनिधी :


वणी लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, नांदेपेरा (इमारत) येथे वार्षिक क्रीडास्पर्धांचा भव्य व उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. क्रीडास्पर्धांचे उद्घाटन विद्यालयाचे अध्यक्ष व माजी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या शुभहस्ते पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष सन्माननीय संजिवरेड्डी बोदकुरवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे उपाध्यक्ष बलदेव खूंगर, लायन्स क्लबचे सभासद शमीमजी अहमद तसेच विद्यालयाच्या प्राचार्या चित्रा देशपांडे मंचावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी वीर बाल दिवसाचे औचित्य साधत संगीत कवायत व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

यानंतर अध्यक्षांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन व फीत कापून व्हॉलीबॉल सामन्याची अधिकृत सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सामन्यात लायन्स हायस्कूलमधील पदाधिकारी व शिक्षक-शिक्षिकांमध्ये चुरशीचा व्हॉलीबॉल सामना रंगला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सामना बरोबरीत सोडवला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला.

उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी क्रीडास्पर्धांचे औपचारिक उद्घाटन झाल्याची घोषणा करत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. क्रीडा व शिक्षण यांचा समतोल राखणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक किरण बुजोणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षक किरण बुजोणे सर, नेहा शेख व रूपेश पिंपळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडास्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त व संघभावना वृद्धिंगत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

एमएसबीटीई परीक्षेत सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश; डी. फार्मसीचा निकाल 95 टक्क्यांहून अधिक

वणी उपविभागातील अवैध ट्रक पार्किंगमुळे रस्ते बनले ‘मृत्यूचे सापळे’; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

‘स्मार्ट मीटर’ची सक्ती केल्यास महावितरणला ‘मनसे स्टाईल’ झटका देणार; वणीमध्ये मनसे आक्रमक, उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन!

महावितरणच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक; वणीत जीर्ण वीजवाहिन्या व बोर्डा गावाच्या वीजकपातीवर ८ दिवसांचा अल्टिमेटम

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत भव्य वृक्षारोपण मोहीम; शेकडो वृक्षांची लागवड, संगोपनाचाही घेतला संकल्प

टाकळी शिवारात निसर्गाचा कहर! वीज कोसळून मेंढपाळासह १३ शेळ्यांचा जागीच मृत्यू; कुटुंबाचा आधार हिरावला

Leave a Comment