ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

सगणापूरमध्ये भीषण आग; शॉर्टसर्किटचा संशय, गरीब शेतमजुराचे घर व संपूर्ण संसार जळून खाक

On: July 5, 2026 2:52 PM
Follow Us:
---Advertisement---

फ्रिज, टीव्ही, कपडे, घरगुती साहित्य आगीत भस्मसात; सुमारे ₹३ ते ₹३.५ लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली

✍️मारेगाव | अशफाक खान


मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे रविवारी (दि. ५ जुलै) दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास एका घराला भीषण आग लागून घरासह संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, संबंधित यंत्रणांकडून घटनेची पडताळणी सुरू आहे.
ही आग ग्रामपंचायत कार्यालयाजवळ राहणारे दिनकर अर्जुन मोहितकार यांच्या घरात लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील फ्रिज, दूरदर्शन संच (टीव्ही), पंखे, कपडे, धान्य, घरगुती साहित्य तसेच दैनंदिन वापराच्या इतर अत्यावश्यक वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.


घटनेची माहिती मिळताच तलाठी, पोलीस, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे आग शेजारील घरांमध्ये पसरण्याचा मोठा धोका टळला.
दिनकर मोहितकार यांच्याकडे स्वतःची शेती नसून ते ठेक्याने शेती करणे आणि रोजंदारी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या आगीत त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला असून, जीवनावश्यक वस्तूही नष्ट झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
गावकऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, या आगीत सुमारे ३ ते ३.५ लाख रुपयांचे नुकसान झाले असावे. मात्र, अधिकृत पंचनामा आणि महसूल विभागाच्या अहवालानंतरच नुकसानीची अंतिम रक्कम स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या दुर्घटनेतील बाधित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, जीवनावश्यक साहित्य तसेच शासनाकडून नियमानुसार मदत त्वरित मंजूर करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

पाटणबोरीत वरली मटका अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; दोन स्वतंत्र कारवायांत पाच आरोपींवर गुन्हे, ५२ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त

पाटणबोरीत पुन्हा अवैध मटक्याचा धुमाकूळ; कायमस्वरूपी बंदची मागणी, कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा

सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजीव भांबोरे यांची तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याणासाठी जिल्हास्तरीय अशासकीय तक्रार निवारण समितीवर नियुक्ती

खैरगाव (दे.) येथे बनावट व मुदतबाह्य कीटकनाशकांचा मोठा पर्दाफाश; ₹17.82 लाखांचा अवैध साठा जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मोहदा येथे भरदिवसा धाडसी घरफोडी; कुलूप तोडून सोन्याचे दागिने व ५० हजारांची रोकड लंपास, फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

बँकेतून मोठी रोकड काढणाऱ्या ग्राहकांनो सावधान!

Leave a Comment