ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

फिस्की जंगलातील दरोडा फसला! ३ लाखांची रोकड भरलेली बॅग कचऱ्यात पडली; दरोडेखोर रिकाम्या हाताने पसार

On: April 7, 2026 6:35 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️मारेगाव: अशफाक खान


मारेगाव तालुक्यातील वणी–मार्डी मार्गावरील फिस्की जंगल परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या दरोड्याच्या थरारक घटनेत मोठी लूट टळली असून तब्बल ३ लाख रुपयांची रोकड सुदैवाने सुरक्षित राहिली आहे. दरोडेखोरांनी धावत्या दुचाकीस्वाराला लक्ष्य करत हल्ला केला, मात्र अनपेक्षितरीत्या बॅग रस्त्याच्या कडेला कचऱ्यात पडल्याने त्यांचा डाव फसला.

प्राप्त माहितीनुसार, चोपण येथील चेतन विजय चिंचोळकर (वय २५) हा शेती खरेदीसाठी ३ लाख रुपये घेऊन दुचाकीने वणीहून आपल्या गावाकडे जात होता. सोमवारी (दि. ६ एप्रिल) रात्री सुमारे ८.४० वाजताच्या सुमारास मार्डी ते बामर्डा जंगल रस्त्यावर समोरून आलेल्या तीन अज्ञात युवकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पुढे जाऊन त्यांनी आपली दुचाकी आडवी घालून चेतनला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एकाने धावत्या दुचाकीला लाथ मारल्याने चेतन खाली कोसळला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले. याच वेळी चेतनच्या दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली रोकड भरलेली बॅग जोराने उसळून रस्त्याच्या कडेला झाडपाल्याच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाऊन पडली. दरोडेखोरांनी तातडीने दुचाकीची झडती घेतली, मात्र त्यांना कोणतीही रक्कम सापडली नाही. दरम्यान, समोरून काही वाहन येताना दिसल्याने दरोडेखोरांनी घाईघाईत घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे दरोड्याचा प्रयत्न अपयशी ठरला. दुसरीकडे, बॅग दिसेनाशी झाल्याने चेतनला ती दरोडेखोर घेऊन गेले असावी, असा संशय निर्माण झाला.
घटनेनंतर चेतन चिंचोळकर यांनी तत्काळ मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. पोलिसांनी मंगळवारी सकाळी घटनास्थळी पंचनामा केला असता रस्त्याच्या कडेला कचऱ्यात ती बॅग आढळून आली. बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये ३ लाख रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

सध्या मारेगाव पोलीस दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा अज्ञात युवकांचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच स्थानिकांकडून माहिती गोळा केली जात आहे. या घटनेमुळे वणी–नांदेपेरा–वडकी मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

🎯 पोलीसांकडून नागरिकांना आवाहन
या प्रकारानंतर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी जंगल मार्गावरून प्रवास करताना काळजी घेणे, मोठी रोकड वाहतूक करताना योग्य सुरक्षा उपाय करणे, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे सांगण्यात आले आहे.
ही घटना दरोडेखोरांच्या धाडसी प्रयत्नांची जाणीव करून देणारी असली, तरी सुदैवाने मोठा आर्थिक तोटा टळल्याने पीडितासह पोलिसांनीही दिलासा व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

वीज समस्यांवर थेट तोडगा; मारेगावात आज ‘जनता दरबार’आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत महावितरण कार्यालयात विशेष उपक्रम; शेतकरी व नागरिकांना तक्रारी मांडण्याचे आवाहन

उभ्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; युवकाचा हात दंडापासून अलग

केगावच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित एसटी बससेवा सुरू करा; अन्यथा मनसेचे तीव्र आंदोलन

सगणापूरमध्ये भीषण आग; शॉर्टसर्किटचा संशय, गरीब शेतमजुराचे घर व संपूर्ण संसार जळून खाक

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

लग्नाच्या महिनाभरातच नवदाम्पत्याची हृदयद्रावक आत्महत्या; पोटाला दगड बांधून विहिरीत उडी, सग्नापूर शोकसागरात

Leave a Comment