ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

घरफोडीचा धक्कादायक प्रकार — 15.50 तोळे सोनं, 9 तोळे चांदी व रोख रक्कम लंपास; शहरात भीतीचे वातावरण

On: April 12, 2026 6:06 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️मारेगाव अशफाक खान


मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 14, भिवाजी नगरी येथे घरफोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अज्ञात चोरट्याने तब्बल साडे पंधरा तोळे सोनं, 9 तोळे चांदी आणि सुमारे 11 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पर्स असा एकूण 3,31,990 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्याला पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, भिवाजी नगर येथील वसंतराव कौरवार यांच्या दुमजली घरात सुशील जंगेवार हे विविध कार्यकारी सहकारी संस्थेत नोकरी करतात कुटुंबासह भाड्याने वास्तव्यास आहेत. दि. 4 एप्रिल रोजी सुशील जंगेवार यांच्या मामाकडून मौल्यवान दागिने त्यांच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यांनी हे सर्व दागिने एका मोठ्या पर्समध्ये सुरक्षित ठेवून देवघराशेजारील धान्याच्या कोठीवर ठेवले होते.
दरम्यान, दि. 7 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास हे दागिने अधिक सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जंगेवार कुटुंबीयांनी पर्स शोधण्याचा प्रयत्न केला असता ती पर्स घरात कुठेच आढळून आली नाही. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. तत्काळ परिसरात शोधाशोध करण्यात आली; मात्र पर्सचा काहीच मागमूस लागला नाही.
यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून मारेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी घरांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

🎯 पर्समध्ये असलेले मौल्यवान दागिने…
चोरीस गेलेल्या पर्समध्ये विविध प्रकारचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने होते. त्यामध्ये 3.5 तोळे चपलाकंठी, 5 ग्रॅमची अंगठी, 7 ग्रॅम चौकोनी अंगठी, 2 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, अर्धा ग्रॅम नथ, 35 ग्रॅम काळी पोत, 18 ग्रॅम नेकलेस, 10 ग्रॅम कानवेल, 4 ग्रॅम कानातले, 17 ग्रॅम चेन, 16 ग्रॅम ब्रासलेट, 5 ग्रॅम पेंडल, 1 ग्रॅम मंगळसूत्र, 1 ग्रॅम पदक तसेच 4 तोळे चांदीचे चाळ आणि 5 तोळे चांदीचे कळ यांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे 11 हजार रुपये रोख रक्कमही पर्समध्ये होती.

🎯 ठसे तज्ज्ञांची तपासणी, पोलिसांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी आठ जणांच्या ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी  तसेच ठाणेदार शाम वानखेडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
पोलिसांकडून परिसरातील संशयितांची चौकशी, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि विविध अंगांनी तपास सुरू असून लवकरच चोरट्याचा माग काढण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment