ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त;  मारेगाव घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

On: April 21, 2026 2:12 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️मारेगाव : अशफाक खान


यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेत तब्बल २१ लाख ३७ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मारेगाव परिसरातील घरफोडी प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

🎯 गुन्ह्याची पार्श्वभूमी
दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी फिर्यादी सुशील जगेंवार (रा. मारेगाव) यांनी त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात इसमांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन मारेगाव येथे दिली होती. त्यावरून अपराध क्रमांक १४२/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३०३ (A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🎯 तपासाची दिशा आणि धागेदोरे
यवतमाळ पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वणी-पांढरकवडा पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू ठेवला होता. दरम्यान, २० एप्रिल २०२६ रोजी खात्रीलायक माहिती मिळाली की, दोन विधीसंगर्षग्रस्त बालकांनी ही चोरी केली असून चोरीचा माल पुसद येथील व्यक्तीमार्फत उमरखेड येथील सराफा व्यावसायिकाला विकण्यात आला आहे.

🎯 आरोपींची कबुली आणि पुढील कारवाई
माहिती मिळताच पोलिसांनी विलंब न करता कारवाई करत संबंधित बालकांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली देत नथ्थु कुरकुटे व दत्ता कुरकुटे (रा. नागवाडी, ता. पुसद) यांच्या माध्यमातून चोरीचा माल विकल्याचे सांगितले.
यानंतर पोलिसांनी पुसद येथे धाड टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तपास वाढवला. या कारवाईत १०० टक्के चोरीचा मुद्देमाल – विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने – जप्त करण्यात आले.

🎯 जप्त मुद्देमाल आणि अटक
या कारवाईत एकूण ₹२१,३७,७७१/- किमतीचे दागिने जप्त करण्यात आले असून, आरोपी दत्ता सटवाजी कुरकुटे (रा. नागवाडी, ता. पुसद) यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन मारेगाव यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

🎯 वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम
ही संपूर्ण कारवाई
🔺पोलीस अधिक्षक श्री. कुमार चिंता
🔺अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अशोक थोरात
🔺उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बिजे
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दत्ता पेंडकर, धीरज बांडे, पो.उपनि. धनराज हाके, शरद लोहकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

🎯नागरिकांना मोठा दिलासा

या धडाकेबाज कारवाईमुळे मारेगाव व परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, घरफोडीच्या वाढत्या घटनांवर पोलिसांनी प्रभावी लगाम लावण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

ही कारवाई म्हणजे गुन्हेगारांना स्पष्ट इशारा असून, यवतमाळ पोलीस गुन्हेगारीविरोधात ठामपणे उभे असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

लग्नाच्या महिनाभरातच नवदाम्पत्याची हृदयद्रावक आत्महत्या; पोटाला दगड बांधून विहिरीत उडी, सग्नापूर शोकसागरात

मार्डा डॅम हत्याकांडाचा २४ तासांत उलगडा; महिलेच्या छेडछाडीच्या रागातून तरुणाचा खून, तीन आरोपी जेरबंद

वणी-मारेगाव रस्त्यावर भीषण अपघात, मारेगावचे सचिन देवाळकर जागीच ठार; ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन चारचाकींची समोरासमोर भीषण धडक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक धडकेने मारेगाव पंचायत समिती हादरली, खंडणी गावातील दूषित पाणीप्रश्न्नी प्रशासनाला जाग; चौकशी समिती गठीत, नवीन बोरवेलचे आदेश

करणवाडी–कुंभा रोडवर अवैध गॅस सिलेंडर वाटप प्रकरण उघड; 4.30 लाखांचा मुद्देमाल जप्त,  गॅस वितरक आणि  वाहन चालकावर  गुन्हा दाखल

Leave a Comment