ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

करणवाडी–कुंभा रोडवर अवैध गॅस सिलेंडर वाटप प्रकरण उघड; 4.30 लाखांचा मुद्देमाल जप्त,  गॅस वितरक आणि  वाहन चालकावर  गुन्हा दाखल

On: April 23, 2026 8:21 AM
Follow Us:
---Advertisement---

✍️मारेगाव:  अशफाक खान


तालुक्यातील करणवाडी ते कुंभा रोडवर घरगुती गॅस सिलेंडरचे अयोग्यरीत्या व अवैध पद्धतीने वाटप सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी  कारवाई करत एकूण 4 लाख 30 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी  जिवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून मारेगावचे प्रभारी पुरवठा निरीक्षक तथा नायब तहसीलदार श्री. विजय दिगांबर मत्ते  यांनी लेखी तक्रार दिली आहे.
आरोपी कोण?

🎯 या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी नामनिर्देशित केले आहे:
🔺महेश हरीदास कावाडे (वय 32, रा. नवरगाव, ता. मारेगाव) – वाहन चालक
🔺धम्मपाल चोखाजी दारूडें (वय 49, रा. मारेगाव) – HP गॅस एजन्सी ग्रामीण वितरक
घटनेचा तपशील
दि. 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:15 वाजता करणवाडी ते कुंभा रोडवर, वणी–करंजी हायवेपासून सुमारे 100 मीटर अंतरावर, MH 29 BE 2737 क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन उभे करून त्यातून HP कंपनीचे गॅस सिलेंडर थेट नागरिकांना वितरित केले जात असल्याचे निदर्शनास आले. ही वितरण प्रक्रिया नियमानुसार नसून अयोग्य ठिकाणी होत असल्याचे आढळले.
याबाबत तात्काळ पंचनामा करून वाहन चालक व संबंधित एजन्सी मालकाचे जबाब नोंदविण्यात आले. चौकशीत गॅस सिलेंडरचे वितरण नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे स्पष्ट झाल्याने तहसीलदारांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.

🎯 जप्त केलेला मुद्देमाल
कारवाईदरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला:
20 रिकामे गॅस सिलेंडर – किंमत ₹30,740
20 भरलेले गॅस सिलेंडर – किंमत ₹50,000
बोलेरो पिकअप वाहन – किंमत ₹3,50,000
एकूण जप्ती: ₹4,30,740
गुन्हा नोंद व पुढील तपास
या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शाम वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

जळका शिवारातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटली; मृतक पांढरकवड्यातील राहुल जोशी

लग्नाच्या महिनाभरातच नवदाम्पत्याची हृदयद्रावक आत्महत्या; पोटाला दगड बांधून विहिरीत उडी, सग्नापूर शोकसागरात

मार्डा डॅम हत्याकांडाचा २४ तासांत उलगडा; महिलेच्या छेडछाडीच्या रागातून तरुणाचा खून, तीन आरोपी जेरबंद

वणी-मारेगाव रस्त्यावर भीषण अपघात, मारेगावचे सचिन देवाळकर जागीच ठार; ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन चारचाकींची समोरासमोर भीषण धडक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक धडकेने मारेगाव पंचायत समिती हादरली, खंडणी गावातील दूषित पाणीप्रश्न्नी प्रशासनाला जाग; चौकशी समिती गठीत, नवीन बोरवेलचे आदेश

२१ लाखांचा मुद्देमाल जप्त;  मारेगाव घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Leave a Comment