ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अवैध गोवंश वाहतुकीवर शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई कंटेनरमधून ३४ बैलांची सुटका; २६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

On: May 13, 2026 1:39 PM
Follow Us:
---Advertisement---


✍️वणी | प्रतिनिधी


यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर पोलिसांनी अवैध गोवंश वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत ३४ गोवंशीय बैलांची सुटका केली असून या प्रकरणात सुमारे २६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही 12 मे रोजी मध्यरात्री दरम्यान  शिरपूर-चारगाव मार्गावरील नाकाबंदी दरम्यान करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित तपासणी व नाकाबंदी सुरू असताना एका संशयित कंटेनरला थांबवून त्याची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये ३४ बैलांना अत्यंत अमानुष आणि क्रूर पद्धतीने कोंबून बांधण्यात आले असल्याचे आढळून आले. जनावरांना हालचाल करण्यासही जागा नसल्याने त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती.
वाहन चालकाकडे गोवंश वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीपत्रे, वैद्यकीय प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, चालकाकडून समाधानकारक माहिती अथवा कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी केली असता सरगम गुलाबसिंग धुर्वे याने गोवंश वाहतुकीसंदर्भात माहिती दिली.

प्राथमिक चौकशीत ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एनएल ०१ एजी १२८८ क्रमांकाचा कंटेनर ताब्यात घेतला. या कारवाईत अंदाजे २० लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच ६ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ३४ बैल असा एकूण २६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक  श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक  श्री. अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वणी  श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि संतोष मनवर, पोउपनि धीरज गुल्हाने, सहायक पोलीस हवालदार इकबाल शेख, पोलीस हवालदार प्रशांत झोड, अविनाश बानकर तसेच पोलीस कर्मचारी मंगेश सलाम, विजय फुलुके आणि किरण दासरवार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतुकीला आळा बसण्यास मदत होणार असून परिसरात या कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

आमचे मार्गदर्शक आयुष्यमान रवींद्र उर्फ बबलूभाऊ मेश्राम, जिल्हाध्यक्ष, भीम आर्मी, यवतमाळ जिल्हा    यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे वणीतील पांदण रस्त्यांची कामे रखडली; दोन दिवसांत कामे पूर्ण न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

वणीतील वाढती गुन्हेगारी, शेतकऱ्यांची उपेक्षा आणि RCCPL च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; राजूभाऊ उंबरकरांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वणी बसस्थानक परिसरात गोदावरी अर्बन मल्टीस्टेटकडून सिमेंट बेंचेसचे लोकार्पण

वणीत वेकोलीच्या कोळसा वाहतुकीचा कहर; धुळीमुळे पिकांचे नुकसान, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर — मनसेचा आंदोलनाचा इशारा

वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूलचा शंभर टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थी व पालकांचा उत्साहात गौरव सोहळा

Leave a Comment